Dhanraj Kopner joins NCP News | Rohit Pawar Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रोहित पवारांकडून भाजपला आणखी एक धक्का

आज पुन्हा रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांना मोठा धक्का देत धनराज कोपनर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडविला आहे.

नीलेश दिवटे

कर्जत ( जि. अहमदनगर ) - जामखेड तालुक्यातील भाजपचे नेते अमोल राळेभात व सुधीर राळेभात यांनी काल ( शनिवारी ) त्यांच्या समर्थकांसह आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचं वेळी रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांना आणखी एक मोठा धक्का देत धनराज कोपनर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडविला आहे. ( Rohit Pawar pushes BJP for second day in a row )

भाजपचे ज्येष्ठ नेते धनराज कोपनर यांनी शेकडो समर्थकांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते व आमदार रोहित पवार यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या मध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांचे सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (Rohit Pawar Latest News Updates)

धनराज कोपनर हे तालुक्यातील धनगर समाजातील प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्यांच्या मुळे कुळधरण जिल्हा परिषद गटात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. ते माजी मंत्री भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जात होते मात्र ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री शिंदे यांना धक्का दिल्याची चर्चा आहे.

आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील एकेक सत्ता केंद्र राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला असून नगरपंचायतमध्ये काँग्रेसला समवेत घेत 17 पैकी 15 जागा जिंकत तेथे भाजपच्या ताब्यातील सत्ता ताब्यात घेतली. हा विजय मिळविल्यानंतर त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे मोर्चा वळविला असून त्या दृष्टीने आगामी व्युव्हरचना आणि डावपेच टाकण्यास सुरवात केली आहे.

जेव्हा ही मंडळी राष्ट्रवादीत यायचे म्हणतात आणि त्यांना घ्यावे अशी विनंती तेथील पदाधिकारी-कार्यकर्ते करतात. तेव्हा आम्ही त्याचे कडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. विरोधकांना त्यांचे पदाधिकारी-कार्यकर्ते त्यांच्याकडे ठेवता येत नसतील तर त्यांनी त्यांचे आत्मपरीक्षण करावे. लोकांच्या हितासाठी गट तट न पाहता परिसराच्या विकास करण्यासाठी काम करीत राहील आणि जुन्या लोकांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही.

- रोहित पवार, आमदार

कर्जत जामखेड चा विकास आमदार रोहित पवार करू शकतात याची खात्री आणि विश्वास पटल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेत त्यांच्याच आग्रहास्तव राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सर्वांना समवेत घेत कुठलीही अपेक्षा न ठेवता मी हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांना या माध्यमातून ताकत आणि न्याय दिला जाईल.

- धनराज कोपनर, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT