कर्जत ( जि. अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींसाठी (Nagar Panchayat Election) आज मतमोजणी सुरू आहे. यात कर्जत नगर पंचायतचा समावेश आहे. ही निवडणूक भाजपचे ( BJP ) माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रतिष्ठेची केली होती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी 12 जागांवर तर भाजपला केवळ दोन जागांवर आघाडी मिळाली आहे.
निवडणुकीत राष्ट्रवादीची एक जागा पूर्वीच बिनविरोध झाली आहे. नगरपंचायतीची ही निवडणूक आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांची राजकीय परीक्षा व सामर्थ्य जोखणारी ठरणार आहे. या निवडणुकीत आजी की माजी... कोण मारतो बाजी, याकडे तालुक्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सध्यातरी रोहित पवार यांनीच बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. (Karjat Nagar Panchayat Election Result Updates)
येथील नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळविली होती. 17 पैकी तब्बल 12 सदस्य निवडून आले होते. एका अपक्ष महिला सदस्याने भाजपला पाठिंबा दिला होता. तो पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता. काँग्रेसला चार जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी मात्र निकाल पूर्णपणे फिरल्याचे दिसते. राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी आघाडी घेतल्याचे समजते. तर भाजपला दोन आणि काँग्रेसला तीन जागांवर आघाडी मिळाली आहे.
कर्जत नगर पंचायत
राष्ट्रवादी - 12
काँग्रेस - 3
भाजप - 2
---------------
राज्यातील इतर नगर पंचायत निकाल -
जळगाव - बोदवळ नगरपंचायत
एकुण जागा-17
भाजप- 0
शिवसेना-1
काँग्रेस-0
राष्ट्रवादी-2
----------
वैभववाडी - एकुण जागा-17
भाजप-2
शिवसेना-1
काँग्रेस-
राष्ट्रवादी-
इतर(अपक्ष)-1
---------
म्हसळा नगरपंचायत
पहिल्या फेरीत 5 जागेवर राष्ट्रवादी विजयी
--------------
माढा नगरपंचायत -
प्रभाग सहा - संजीवनी भांगे 204 (राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक 7 - अर्चना कानडे (शिवसेना) 222.
प्रभाग आठ - संगीता साठे 307(अपक्ष)
प्रभाग क्रमांक 9 - चंद्रशेखर गोटे ( राष्ट्रवादी )242
प्रभाग दहा - शबाना बागवान. 258 काँग्रेस
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.