Rohit Pawar | Prakash Ambedkar
Rohit Pawar | Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar : वंचित बहुजन आघाडीवर रोहित पवारांचा मोठा आरोप : म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Rohit Pawar : पुण्यातल्या पोटनिवडणुकीत भाजपने किती आर्थिक ताकद लावलेली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटताना पकडण्यात आले. त्यांचे सर्व महत्त्वाचे नेते तिथे ठाण मांडून आहेत. पैशांचा वापर मतांचे विभागणी व्हावी, यासाठी करण्यात येत असतो. वंचित बहुजन आघाडी अप्रत्यक्षपणे भाजपालाच मदत करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.

रोहित पवार (Rohit Pawar) आज नाशिकमध्ये बोलत होते. महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या या त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन, ते विद्यार्थी- युवकांशी संवाद साधत आहेत.

भाजपकडून निवडणुकीत पैशाचा वापर केला जातोय का? असा प्रश्न विचारले असता पवार म्हणाले, "लोकांमध्ये अशी चर्चा आहे. भाजपच्या काही लोकांना पैशांचा वाटप करताना पकडले गेले. भाजपने किती आर्थिक ताकद लावलेली आहे? त्यांचे सर्व नेते तिथे व्यस्त आहेत. पैशाचा वापर मतांची विभागणी करण्यात येत असल्याचं, रोहित पवार म्हणाले. तसेच, वंचित बहुजन आघाडी ही अप्रत्यक्षरिपणे भाजपालाच मदत करत आहे. तिथे कुणी विकास केला, हे लोकांना माहितीच आहे," असेही ते म्हणाले.

"सद्यस्थितीत गुंडगिरी सुरू आहे. पण लोकं विकासाच्या मुद्द्यावर, बाजूने निर्णय घेतील, यावर माझा विश्वास आहे. राजकारण, सरकारने घेतलेले निर्णय आणि निवडणुका याचं योगायोगाने टायमिंग बरोबर साधलं जात आहे. चिंचवडमध्ये एक अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्याकडे किती आणि कसे खोके आले, हा एक प्रश्न आहे," असेही रोहित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT