By-Election
By-Election Sarkarnama

By-Election : चिंचवडमध्ये ५१० मतदान केंद्रावर तीन हजार कर्मचारी अन् पावणेचार हजार पोलीस तैनात

Chinchwad : चिंचवडच्या निवडणुकीत यावेळी एक सखी मतदान केंद्र, तर तीन मॉडेल पोलिंग स्टेशन

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून त्याची पूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. राज्यात सर्वाधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात ५१० मतदान केंद्र असून तेथे तीन हजार कर्मचारी, अधिकारी तर बंदोबस्तासाठी पावणेचार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठीचे साहित्य वाटप आजच करण्यात आले. तत्पूर्वी मतदान कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण आज दिले.

By-Election
Indapur News : राष्ट्रवादीला उच्चांकी मतदान देणाऱ्या गडाला भाजपकडून सुरूंग : हर्षवर्धन पाटील, राम शिंदेंचे इंदापुरात धक्कातंत्र

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे, निवडणूक सहायक अधिकारी नागेश गायकवाड, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, निवडणूक सहायक अधिकारी प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, समन्वयक सिताराम बहुरे, भेल इलेक्ट्रॉनीक्सचे तज्ज्ञ अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर निवडणूक साहित्याचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. ते मतदार केंद्रावर पोहोचण्यासाठी एमपीएमएलच्या १०२ बसेस, ८ मिनीबस आणि १२ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी ५१ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिकाऱ्यांची नियुक्ती बंदोबस्तासाठी करण्यात आली आहे.

By-Election
Jitebdra Avhad : पोलीस ठाण्यातच एकाचा मृत्यू : पोलिसांत एवढी मग्रुरी कशाने आली? आव्हाड संतप्त

पोटनिवडणूक मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली असून ही पोटनिवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या मतदार संघातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा संविधानिक अधिकार बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

By-Election
Politics : रस्त्यावर सहा हजार किलो गुलाबांच्या पाकळ्या अन्..; स्वागत पाहून प्रियंका गांधी भारावल्या

सखी मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी यावेळी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयांमध्ये १९५ क्रमांकाचे मतदान केंद्र 'सखी मतदान केंद्र' म्हणून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्या केंद्राची विशेष रचना तयार करण्यात आली आहे.

रावेत येथील बबनराव भोंडवे शाळेमधील २३ क्रमांकाचे केंद्र तसेच वाकड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ३९५ आणि ४०५ क्रमांकाचे केंद्र आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग स्टेशन) म्हणून तयार करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com