Solapur, 13 April : रोहित पवारने राजकारणात कसं टिकावं, याची काळजी केली, तर बरं होईल. कारण रोहितचा जीव आणि त्याची पार्टी आता खूप छोटी झालेली आहे. लय मोठा घास घेण्यात आणि उंटाचा मुका घेण्यात काही अर्थ नाही. कर्जत-जामखेडच्या लोकांनी रोहित पवारची शिकार करू नये, याची काळजी त्याने घ्यावी, बाकीच्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत त्याने पडू नये, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.
सोलापूर दौऱ्यावर आलेले आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या (ता. १४ एप्रिल) जयंती आहे, त्यानिमित्ताने बूथ पातळीवर जयंती साजरी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. या दरम्यान नव्या नेमणुका, संघटना विस्तारित कारणे याबद्दल चर्चा झाली आहे.
आमदार पडळकर म्हणाले, करमाळा (Karmala) तालुक्यात वरकटणे येथे मेंढपाळावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मेंढपाळांवर सातत्याने अन्याय सुरू आहे. मेंढपाळांना मारतेवेळी मला शिव्या दिल्या जातात, जातीवाद प्रचंड फोफावला आहे. करमाळ्यातील घटना अतिशय निंदनीय आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये 326 ने गुन्हा दाखल आहे. मात्र, 307 आणि 309 प्रमाणे कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. मारहाणीत जखमी झालेल्या आमच्या भगिनीला पुण्यात ससून रुग्णालयात शिफ्ट केलेले आहे, तिची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांना तात्काळ अटक करा, अशी आमची मागणी आहे, असेही आमदार पडळकर यांनी सांगितले.
नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादबाबत आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आयटी सेक्टरमध्ये अशा जिहादी प्रवृत्तीची लोकं मोठ्या पदावर बसलेली आहेत. त्यांच्या पदाचा प्रभाव पडू शकतो, अशा जिहाद्यांची हकालपट्टी करणे गरजेचे आहे. अशा ठिकाणी मुलींनी काळजीपूर्ण काम केलं पाहिजे
नाशिकमध्ये जिहादी पद्धतीनेच 9 मुलींना फसवलंय, असं नाशिक पोलिसांचं म्हणणं आहे. आयटी सेक्टर अशा पद्धतीने प्रभावित झालं आणि हिंदू मुलींवर अशा पद्धतीने अन्याय झाला, तर हे अतिशय गंभीर आहे, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले. पुणे हे आयटी हब आहे, त्यामुळे त्याठिकाणी अशा पदावर कोणी बसले असेल तर त्यांना तत्काळ काढून टाकावे, अशी आमची मागणी आहे.
काळजीपूर्वक बोललं पाहिजे
अजिदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. ते स्वप्न सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण होईल. या आदिती तटकरे यांच्या विधानाबाबत मी काही बोलणार नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम असून राज्य चालवीत आहेत. अशी विधाने करणाऱ्यांनी काळजीपूर्वक बोललं पाहिजे, असेही पडळकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.