DPC Election : सोलापुरात मलाईदार पोस्टच्या निवडणुकीसाठी हालचाली : तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व राहणार

Solapur Political News : सोलापुरात 9 वर्षांनंतर डीपीसी निवडणूक होत असून भाजप वर्चस्व, पालकमंत्र्यांच्या 18 जागा आणि निधी वाटपावरून राजकीय संघर्षामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
DPC Election
DPC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 April : सोलापूर जिल्ह्यात आणखी एका महत्वाच्या आणि मलाईदार पोस्टच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाची यापूर्वी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती, त्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर जिल्हा नियोजन समितीच्या ४० जागांसाठी निवडणूक होत आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे बहुमत असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही भाजपचे वर्चस्व राहणार आहे, हे निश्चित.

जिल्हा नियोजन समितीवर (DPC) जिल्हा परिषदेतून २७, महापालिकेतून ९ आणि नगरपरिषदा/नगरपंचायतींमधून ४ असे एकून ४० सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात. या निवडणुकीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सदस्यांची यादी मागितली जाणार आहे. या मतदार याद्यांना प्रारूप प्रसिद्धी देऊन त्यावर दावे व हरकती, सुनावण्या घेऊन मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्या दृष्टीने येत्या आठवड्यात हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

सोलापूर (Solapur) जिल्हा नियोजन समितीची यापूर्वी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायतींची २०२१-२०२२ मध्ये मुदत संपल्याने डीपीसीवरील नियुक्त्याही संपुष्टात आल्या होत्या. आता जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्याने डीपीसीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

डीपीसीची ४० जागांसाठी २०१७ नंतर आता तब्बल ९ वर्षांनी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करणे, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षण निश्‍चित केले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया एप्रिल व मे महिन्यात पूर्ण करून डीपीसीसाठी प्रत्यक्षात निवडणूक जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.

२०१७ च्या तुलनेत जिल्ह्यात नगरपरिषदा/नगरपंचायतींची संख्या वाढल्याने जिल्हा परिषदेच्या २७ जागांमधून एक जागा कमी होऊन नागरी भागासाठी एक जागा वाढण्याची शक्यता आहे. २०२६-२०२७ या वर्षातील विकासकामांना मंजुरी देण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात डीपीसीची बैठक होण्याची शक्यता आहे.

DPC Election
Eknath Shinde On BJP Minister : एकनाथ शिंदेंनी भाजप मंत्र्याला सुनावले : सरकारी पैशावर कोणी अधिकार सांंगू नये; ते जनतेचे आहेत, याची जाणीव ठेवा

या बैठकीपूर्वी डीपीसीची निवडणूक शक्य नाही. डीपीसीवर जिल्हा परिषद अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्याने दीपक वैद्य यांना या बैठकीत बसता येणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अधिकारातून महापौर विनायक कोंड्याल यांना या बैठकीत बसता येणार आहे. या शिवाय शिवसेनेकडून खासदार झालेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांनाही विशेष निमंत्रित म्हणून या बैठकीत बसता येणार आहे.

पालकमंत्र्यांच्या हाती १८ जागा

जिल्हा नियोजन समितीवर निवडणुकीतून ४० सदस्य येतात. पालकमंत्र्यांच्या शिफारसीने नामनिर्देशितच्या ४ व विशेष निमंत्रितच्या १४ अशा एकूण १८ जागा भरल्या जातात. पालकमंत्री गोरे यांनी आतापर्यंत या १८ जागा रिक्तच ठेवल्या आहेत.

या १८ जागांवर नियुक्ती कधी होणार आणि कोणाची वर्णी लागणार? या बद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अन्याय झालेल्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. अन्याय दूर करण्यासाठी पालकमंत्री गोरे कधी पुढाकार घेणार? या बद्दल कमालीची उत्सुकता आहे.

निधीवाटपासाठी महत्त्वाची बैठक

डीपीसीच्या निधी वाटपावरून पालकमंत्री जयकुमार गोरे व काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. डीपीसीमधून २०२६-२०२७ या वर्षासाठी घेतल्या जाणाऱ्या कामांना मान्यता देण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बैठक होणार आहे.

DPC Election
Ashok Kharat : अशोक खरातची सोलापूरवर नजर; तब्बल 11 एकर जमिनीची खरेदी, शक्तीपीठमधून जादा मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे

जिल्ह्यात महाविकास आघाडीचे तीन खासदार आणि पाच आमदार आहेत. निधी वाटपात कोणाचा किती वाटा? हे या बैठकीत स्पष्ट होणार असल्याने राजकीय, प्रशासकीयदृष्ट्या ही बैठक सर्वांसाठीच महत्त्वाची मानली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com