Pravin Darekar-Rohit Pawar
Pravin Darekar-Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्रवीण दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांनी दिले सडेतोड उत्तर : म्हणाले...

अमित आवारी

अहमदनगर - जामखेड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार रोहित पवार म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नामुळेच राज्यात 2014 ला सत्तांतर होऊन भाजपचे सरकार येईल आणि गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होतील, असे वाटत होते, या त्यांच्या मतावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी टीका केली होती. या टीकेला रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून उत्तर दिले. ( Rohit Pawar's conclusive answer to Praveen Darekar's criticism: He said ... )

पुणे येथील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांच्या वक्तव्यावर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाचा पवार घराण्यातील नेमका कोण उमेदवार आहे, हे आमदार रोहित पवार यांनी आधी जाहीर करावे. त्यानंतर हयात नसलेल्या मुंडे साहेबांबद्दल बोलावे, अशी टीका केली होती.

या टीकेला उत्तर देताना रोहित पवार यांनी सोशल मीडियावर म्हंटले आहे की, काही राजकीय नेत्यांचं कर्तृत्व राजकारणाच्या पलिकडं असतं तसंच कर्तृत्व स्व. मुंडे साहेबांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे.

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, त्यामुळं स्व. मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर साहेब आपण स्वागत करायला हवं होतं. परंतु तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली हे आश्चर्यकारक आहे. कदाचित मुंडे साहेबांच्या निधनानंतर आपण भाजपमध्ये आल्याने आपणास मुंडे साहेब समजले नसावेत आणि हो... पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार!, असा टोलाही त्यांनी दरेकर यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT