पंकजा मुंडेच्या 'त्या' वक्तव्यावर धनंजय मुंडे म्हणाले...

जामखेड शहरात भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 8 वा स्मृतिदिन कार्यक्रमाला राज्याचे समाजकल्याण विभागाचे मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) उपस्थित होते.
Pankaja Munde-Dhananjay Munde
Pankaja Munde-Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - जामखेड शहरात भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 8 वा स्मृतिदिन कार्यक्रमाला राज्याचे समाजकल्याण विभागाचे मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) उपस्थित होते. भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी एका कार्यक्रमात माझ्या वाट्याला संघर्ष आला आहे असे सांगितले. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले. ( Dhananjay Munde said on Pankaja Munde's 'that' statement ... )

धनंजय मुंडे म्हणाले, आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवी पुण्यतिथी आहे. आज सकाळीच मी महाविकास आघाडीच्या वतीने गोपीनाथ गडावर जाऊन त्या स्थळी नतमस्तक झालो. त्यानंतरच येथे आलो. ज्यांचे संपूर्ण जीवन संघर्षात गेले. त्यांना खऱ्या अर्थाने संघर्षयोद्धा होते. या लोकनेत्याला नतमस्तक होऊन मी हेच सांगत आहे की, त्यांना संघर्ष करावा लागला. हा संघर्ष आमच्या कुटुंबाच्या पाचवीला पुजला आहे. त्यातील काही भाग माझ्याही वाट्याला आला. कदाचित त्यांनाही वाटत असेल की त्यांच्या वाट्याला संघर्ष आला आहे. स्वतःचे नेतृत्त्व दाखवायचे म्हणून नव्हे, स्वतःला स्थापित करण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या जीवनासाठी होता. त्यांच्या या संघर्षाला आम्ही नतमस्तक झालो आहे.

Pankaja Munde-Dhananjay Munde
मला धनंजय आणि पंकजा मुंडे दोघेही सारखेच...

ते पुढे म्हणाले की, कुठल्या शहराचे नामांतर करायचे अथवा करू नये हा सरकारचा विषय आहे. कोणी कोणती मागणी करावी हा ज्याला त्याला घटनेने दिलेला अधिकार आहे. मागील पाच वर्षांच्या काळामध्ये ज्यावेळी भाजप सत्तेत होते. त्या काळात अनेक जणांनी मागणी केली होती. यात या भागातील तत्कालीन आमदार व मंत्री असलेलांनीही मागणी केली होती. त्यावेळी नामांतर का झाले नाही याचे उत्तर भाजपच्या या नेत्यांनी द्यावे आणि नंतरच महाविकास आघाडीकडे नामांतराची मागणी करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com