Ramdas Athavale & Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवार जातीवादी नाहीत मात्र त्याच्या पक्षात जातीवादी वृत्तीचे काही लोक दिसतात...

Ramdas Athavale|NCP|Narendra Modi|BJP|RPI|Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता शरद पवार यांनी त्यांच्यावर धर्मांधतेचा केलेला आरोप चुकीचा आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वातील केंद्र सरकार (Central Government) हे सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन देशाचा विकास करणारे सरकार असून मुस्लिम समाजाला संरक्षण, समान हक्क देणारे व मुस्लिमांचा विश्वास जिंकणारे सरकार आहे. पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) धर्मांधतेचा केलेला आरोप चुकीचा आहे,असे मत रिपब्लिकन पक्षाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केले आहे. याबरोबरच शरद पवार हे जातीवादी नाहीत मात्र, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातीवादी वृत्तीचे काही लोक दिसतात, अशी टीकाही आठवले यांनी केली आहे.

कर्नाटकात विशिष्ट धर्माच्या लोकांच्या दुकानातुन वस्तू खरेदी करू नका असा फतवा काही संघटनांनी काढला असून त्याचा संदर्भ देऊन पवारांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर धर्मांधतेचा आरोप केला होता. त्यावर आठवलेंनी मोदींच्या कामांचे कौतुक केले आणि पवारांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आठवले म्हणाले, पंतप्रधान मोदी सबका साथ सबका विकास सबका विश्वास या अजेंड्यावर सरकार चालवीत असून संविधानाला राष्ट्रग्रंथ मानून काम करीत आहेत. कोणत्याही जाती धर्मावर अन्याय करण्याची त्यांची भूमिका नसून सर्वांना न्याय देण्याची भूमिका मोदींची असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या असून माझ्या रिपब्लिकन पक्षातर्फेही देशभरातील मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या मी शुभेच्छा देत आहे. तसेच भारताच्या विकासासाठी आणि मजबुतीसाठी हिंदू-मुस्लिमांनी एकत्र आले पाहीजे, असे आवाहनही आठवलेंनी यावेळी केले.

दरम्यान, पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेवर बोलतांना आठवलेंनी पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेला चुकीचे म्हणत त्याचे खंडण केले. मात्र, पवार यांच्यावर थेट टीका करणे टाळले. ते म्हणाले की, शरद पवार हे जातीवादी नाहीत मात्र, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातीवादी वृत्तीचे काही लोक दिसतात, अशी टीका मात्र त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT