Ruchesh Jayavanshi, Shekhar Singh
Ruchesh Jayavanshi, Shekhar Singh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : रुचेश जयवंशी साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी, शेखर सिंह यांची बदली

Umesh Bambare-Patil

सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राज्य बियाणे महामंडळ अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अत्यंत काटेकोर आणि प्रशासकीय शिस्तीचे अधिकारी म्हणून श्री. जयवंशी यांची ख्याती आहे.

मार्च २०२०२ मध्ये शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरोना महामारीचे संकट जिल्ह्यावर आले होते. या महामारीत महसूल विभागाची यंत्रणा हाताशी घेऊन अत्यंत त्यांनी महामारीचा धैर्याने मुकाबला केला. जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न तसेच विविध विकास योजना, जंबो कोविड हॉस्पिटल, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, भूस्खलनग्रस्तांना मदत आदी महत्वाच्या प्रसंगी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन जनतेला जास्तीत जास्त मदत केली.

सातारा शहराची हद्दवाढ, डीपीडीसी मधील निधी संदर्भातील विविध स्त्रोतांचे बळकटीकरण याचे मंत्रालयात सादरीकरण करणारे शेखर सिंह यांची कार्यपद्धती नेहमीच वाखाणली गेली. राज्य स्तरावर साताऱ्याचे उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक झाला. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या बदलीचा ई-मेल मंत्रालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला.

त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अकोला येथील व्यवस्थापकीय संचालक रूचेश जयवंशी यांची वर्णी लागली आहे. रुचेश जयवंशी हे 2009 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. तसेच राज्याचे महिला बालकल्याण आयुक्त म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला आहे.

सध्या ते अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. अत्यंत काटेकोर आणि प्रशासकीय शिस्तीची अधिकारी म्हणून श्री. जयवंशी यांची ख्याती आहे. येत्या काही दिवसातच ते पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT