सातारा : कोरोनाची लढाई जिल्हा म्हणून जिंकायची आहे. त्यासाठी कोरोना वॉरिअर्सचा महत्वपूर्ण रोल आहे. यामध्ये सर्वात अग्रस्थानी कार्यरत असलेले विलगीकरण कक्षात काम करणारे आरोग्य अधिकारी, कर्मचारी व स्वच््छेतेच काम करणारे कर्मचारी महत्वपूर्ण भुमिका बजावत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते कोरोनाबाधित रूग्ण बरा झाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करत आहेत, या सर्वांना माझा सलाम आहे, अशी भावना साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व कोरोना वॉरिअर्सचे सातारा जिल्ह्यात महत्वपूर्ण काम करत आहेत, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, मी कोरोना वॉरिअर्सचे मी विशेष अभिनंदन करत आहे.
यामध्ये सर्वात अग्रणी असलेले विलगीकरण कक्षात काम करणारे डॉक्टर्स, नर्स आणि स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी हे आज महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाबाधित रूग्ण बरा झाला पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत या सर्वांच्या प्रयत्नामुळे चार रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे या सर्वांचे मी खुप खुप अभिनंदन करतो.
आरोग्य विभागाचे कर्मचारी जे लॉकडाऊन असलेल्या ग्रामीण भागात काम करत आहेत. यामध्ये आशा, अंगणवाडी सेविका, काही शिक्षक यांचा समावेश आहे. हे सर्वजण स्वतःचा जीव धोक्यात घालून गावोगावी कोरोनाचा सर्व्हे करत आहेत. या सर्व आरोग्य सेवकांना माझा सलाम आहे.
यासोबतच रस्त्यावर थांबून पोलिस कर्मचारीही बंदोबस्त करत आहे. या सर्व कोरोना वॉरिअर्सना माझा सलाम असून त्यांचे मी आभार मानत आहे. त्यांनी यापुढेही असेच काम करून जिल्हा कोरोनामुक्त करण्याची लढाई यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.