Ruturaj Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ruturaj Patil : 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत कोल्हापूर दक्षिणेत प्रचाराचा नारळ फुटला, ऋतुराज पाटलांविरोधात कोण?

Kolhapur Vidhan Sabha Ruturaj Patil vs Shoumika Mahadik : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गणेश उत्सवाचे अवचित्य साधून या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटला आहे.

Rahul Gadkar

राज्यात सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ही कोल्हापुरातील महाडिक आणि पाटील गटात होत असते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा राज्यात नेहमीच मध्यभागी राहिला आहे. पैशाचा होणारा वारेमाप खर्च, कार्यकर्त्यांची टोकाची ईर्षा, आणि इच्छुक उमेदवारांनी लावलेल्या जोडण्या यावरच या मतदारसंघातील आमदार ठरत असतो. 2014 चा अपवाद वगळता आतापर्यंत सर्व बाजूंनी भक्कम असणारा उमेदवारच या ठिकाणी विजयी झालेला आहे.

2014 ला देशात मोदी लाट असताना केवळ पंधरा दिवसात भाजपचा आमदार याच मतदारसंघातून निवडून आला आहे. शिवाय राजकीय वैरत्व असलेले महाडिक आणि पाटील गट हे दोनच या मतदारसंघात प्रबळ असल्याने पारंपारिक लढत पुन्हा एकदा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गणेश उत्सवाचे अवचित्य साधून या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटला आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Constituency) भाजपचे माजी आमदार अमल महाडिक किंवा गोकुळ संचालिका शौमिका महाडिक या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून (Congress) आमदार ऋतुराज पाटील हे महाविकास आघाडीकडून शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. जवळपास या दोघांच्यातच लढत निश्चित झाले असल्याने दोन्ही गटांकडून गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली नसली तरी या मतदारसंघात काँग्रेस, भाजप दोन्ही पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अमल महाडिक यांनी पत्र पाठवून मतदारांना साद घातली आहे, तर ऋतुराज पाटील यांनी लोकसंपर्क, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि मतदार नोंदणीवर भर दिला आहे. शिवाय गणेशोत्सवाच्या निमित्ताने ऋतुराज पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तरुण मंडळांना गणेश उत्सवात लागणारी पूजेचे साहित्य पुरवले आहे.

भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी प्रचाराला सुरुवात केली असून मतदारांना आवाहन करणारे भावनिक पत्र त्यांनी पोहोचवले आहे. घरोघरी पत्र हे पोहोचले असून त्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजना मतदारापर्यंत पोहचवल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचाही यामध्येही समावेश आहे. तसेच पुन्हा सेवेची संधी द्या, असे आवाहनही केले आहे.

तर काँग्रेसकडून आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांनी देखील तरुण मंडळाचा संपर्क ठेवला आहे. शहर आणि ग्रामीण भागात ठीक ठिकाणी मतदान संपर्क फलक लावत त्यांनी आपली लढत निश्चित केली आहे. मतदारापर्यंत संपर्क ठेवण्यासाठी जागोजागी शिबिरांचे आयोजन, मंडळांना भेटी देत आरत्यांचे उपक्रम ठेवत प्रचाराला सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT