Madha Politics : अजितदादांच्या आमदाराची डोकेदुखी वाढली; मागील निवडणुकीत सोबत असलेल्या नेत्यानेही साथ सोडली

Assembly Election 2024 : मागील विधानसभा निवडणुकीत खंबीर साथ दिलेल्या माढ्याच्या साठे गटाने आता बबनराव शिंदे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बबनदादा शिंंदेंपुढील अडचणी दररोज वाढताना दिसत आहेत.
Babanrao Shinde-Meenal Sathe
Babanrao Shinde-Meenal SatheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 September : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढू लागली आहे. आमदार शिंदे यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दाखल होत आहेत. त्यातच मागील निवडणुकीत साथ दिलेल्या साठे गटानेही आता सवतासुभा मांडला आहे. माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांनीही आमदार शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोकसभा निवडणुकीत माढ्यातून शरद पवार गटाचे उमेदवार आणि शिंदेंचे कट्टर राजकीय विरोधक धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले, त्यामुळे शिंदे विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात घडामोडी घडत आहेत. शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत विधानसभा निवडणूक तुतारीवर लढविण्याची तयारी दर्शविली होती.

त्यानंतर खुद्द बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या भेटीचा तपशील अजूनही बाहेर आलेला नाही. मात्र, तुतारीवर निवडणूक लढविण्याची तयारी बबनदादांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी दाखवल्याची चर्चा आहे.

Babanrao Shinde-Meenal Sathe
Governor Appointed MLC : राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी अजितदादांपुढे शक्तिप्रदर्शन; पवारांनी काय दिला शब्द?

दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत खंबीर साथ दिलेल्या माढ्याच्या साठे गटाने आता बबनराव शिंदे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांनी माढा मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे बबनदादा शिंंदेंपुढील अडचणी दररोज वाढताना दिसत आहेत.

मीनल साठे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी व गाव दौरे सुरू केले आहेत. त्यातूनच त्यांनी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

Babanrao Shinde-Meenal Sathe
Rajendra Raut : जरांगेंसोबतच्या वादानंतर राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली मोठी मागणी

अभिजीत पाटलांचं काय?

पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ते गेली काही दिवसांपासून माढा मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे अभिजीत पाटील हे महायुतीसोबत आहेत आणि माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हेही अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्येच आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com