साजन पाचपुते सरकारनामा
पश्चिम महाराष्ट्र

'नागवडे', 'कुकडी'वर साजन शुगरची बाजी

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( अहमदनगर ) : श्रीगोंदे ( Shrigonde ) तालुक्यातील नागवडे व कुकडी जगताप सहकारी साखर कारखान्यांनी निवडणुकीच्या वर्षातील यंदाच्या गाळपात पहिला हप्ता प्रतिटन 2250 रुपये काढला आहे. मात्र देवदैठण येथील साजन शुगर कारखान्याने या दोन्ही कारखान्यांवर पहिल्या हप्त्यात आघाडी घेतली आहे. साजन शुगरने पहिला हप्ता 2300 रुपयांनी काढला असून दराबाबत मागे राहणार नसल्याचा दावा कारखाना अध्यक्ष साजन पाचपुते यांनी केला आहे. Saajan Sugar's bet on 'Nagwade', 'Kukdi'

नागवडे व कुकडी सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. निवडणुकीच्या वर्षात हे कारखाने चांगला दर देणार हे गृहित धरण्यात आले आहे. त्याप्रमाणे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी चालू गाळप हंगामात प्रतिटन 2600 रुपये दर देण्याची घोषणा करतानाच पहिला हप्ता 2250 ने काढला आहे. कुंडलिकराव जगताप कुकडी कारखान्याने त्यांना अंतीम दर जाहीर केला नसला तरी पहिला हप्ता नागवडे कारखान्याप्रमाणेच काढत स्पर्धेत कायम असल्याचे दाखविले आहे.

दरम्यान दिवंगत नेते सदाशिव पाचपुते यांनी देवदैठण येथे सुरु केलेल्या त्यावेळच्या साईकृपा व आजच्या साजन शुगर या कारखान्याने मात्र पहिल्या हप्त्यात या दोन्ही कारखान्यांवर कुरघोडी केली आहे. साजन शुगरने त्यांचा पहिला हप्ता 2300 रुपयांनी काढत स्पर्धेत तेही भक्कमपणे असल्याचे दाखवून दिले आहे.

'सरकारनामा'शी बोलताना साजन पाचपुते म्हणाले, अण्णांचे स्वप्न पुर्ण करतानाच शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दुसऱ्या कारखान्यांशी कुठलीही स्पर्धा करीत नाही. सध्या पाऊण लाख टनाचे गाळप झाले असून तीन लाख टन गाळप करणार आहोत. अंतिम दर देताना कमी राहणार नाही याची ग्वाही देतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT