नागवडे कारखान्यातील सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांच्या एकीच्या हालचाली

नागवडे साखर कारखान्यात भाजप ( BJP ) नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
nagawade karkhana.jpg
nagawade karkhana.jpgsarkarnama
Published on
Updated on

श्रीगोंदे ( अहमदनगर ) : नागवडे कारखाना निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुप्त बैठका, नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी राजेंद्र नागवडे यांच्या गटाला कडवी लढत देण्यासाठी विरोधकांची एकी करण्याची रणनीती आखली जात आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात खासदार व आमदार या भाजप ( BJP ) नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. Attempts by the opposition to unite at Nagwade Sugar Factory

शिवाजीराव नागवडे यांच्या निधनानंतर होणारी ही पहिली निवडणूक गाजण्याच्या मार्गावर आहे. कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर विरोधक तुटून पडले असतानाच, अध्यक्षांनीही विरोधकांना शेलक्या शब्दांत फटकारले आहे. राजेंद्र नागवडे यांची खासगी साखर कारखानदारी हा कळीचा मुद्दा होत आहे. यापूर्वी आमदार बबनराव पाचपुते यांनी खासगी कारखाना काढल्यावर त्यांच्या हाती सहकाराची ही कामधेनू देणार का, हा भावनिक मुद्दा नागवडे यांनीच केला होता. आता त्यांचीच खासगी कारखानदारी असल्याचा मुद्दा विरोधक असणारे केशवराव मगर यांनी पुढे केला आहे. त्यामुळे निवडणूक चर्चेत आली आहे.

nagawade karkhana.jpg
नागवडे साखर कारखाना निवडणूक : समर्थकांचा बबनराव पाचपुते यांना सर्वाधिकार

दरम्यान, कारखाना निवडणुकीत नागवडे यांच्याविरुद्ध नेमके कोण असेल व सोबत कोण असेल, याची जोरदार चर्चा रंगत आहे. विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आमदार पाचपुते यांच्या विजयाला त्यांचा हातभार लागल्याचे नागवडे यांचे म्हणणे आहे.

या उपकाराची परतफेड पाचपुते यांना कारखाना निवडणुकीत मदत करून करावी लागेल, असा त्यांचा दावा आहे. मात्र, पाचपुते ते मान्य करणार, का हा प्रश्न अनुत्तरित आहे. शिवाय, कदाचित पाचपुते यांनी नागवडे यांना मदत करण्याचे ठरवले व काही जागांची मागणी केली, तर नागवडे त्यांना त्या जागा देणार का, यावर नेत्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची मात्र उलटसुलट चर्चा होत आहे.

nagawade karkhana.jpg
अनुराधा नागवडे म्हणाल्या, भाजप घाणेरडे राजकारण करतेय

विरोधकांची मोट बांधण्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार पाचपुते यांची भूमिका महत्त्वाची आहे. विखे पाटील यांना मानणारे बहुतेक कार्यकर्ते नागवडे यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे आता पाचपुते यांची भूमिका दोन दिवसांत बैठकीत निश्चित होणार असल्याचे समजते.

nagawade karkhana.jpg
'नागवडे उसाच्या वजनात काटा मारून कुटुंबातील व्यक्तींच्या नावे पैसे काढतात'

नागवडे कारखान्याबाबत अध्यक्षांना काही सूचना केल्या होत्या. त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. आता निवडणूक अटळ आहे. आमदार पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांची दोन दिवसांत बैठक होत आहे. त्यात निवडणुकीची दिशा ठरेल.

- भगवानराव पाचपुते, माजी उपाध्यक्ष, नागवडे कारखाना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com