Sachin Ahir
Sachin Ahir Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे शिवसेना नेत्याने सांगितले कारण...

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : राज्यातील शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचे संतुलन बिघडले आहे, त्यामुळेच हिवाळी अधिवेशन आले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. जे स्वतःचे भविष्य जे बघतात, त्यांना जनतेच्या भविष्याशी काय घेणे देणे नाही? अशा शब्दांत शिवसेनेचे नेते (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. (Sachin Ahir said that the cabinet of Shinde government was not expanded because...)

कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सचिन अहीर हे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे कारण सांगितले. आमदार सचिन अहिर म्हणाले की, ‘‘मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. पावसाळी अधिवेशन असेच गेले आहे. आता हिवाळी अधिवेशन आले तरी विस्तार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने मंत्र्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सभागृहात विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या जनतेच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार? ज्या आमदारांना त्यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते, ते आश्वासनही शिंदे हे पूर्ण करू शकलेले नाहीत.

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरे केले नाहीत. पण, त्यांचे देवदर्शन आणि यात्रा मात्र जोरात सुरू आहेत. स्वतःचे नवस फेडण्यापेक्षा जनतेसाठी नवस केले असते तर बरे झाले असते, असा टोलाही अहीर यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

अहिर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकत असल्याची टीका होते आहे. पण, शिवसेनेचे पाय मातीत घट्ट रोवलेले आहेत. शिवसेनेसोबत वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे आणि विचारांचे येत आहेत. त्यामुळे शिवसेनेची स्थिती भक्कम आहे, हे आगामी काळच दाखवून देणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःचे भविष्य जोतिषाकडे पाहतात. त्यांना जनतेच्या भविष्याशी काही एक देणे घेणे नाही. मुख्यमंत्री आमच्यावर ज्या शब्दांत टीका करतारत, ते त्यांच्या पदाला शोभणारे नाही, अशी टीकाही सचिन अहीर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT