भुजबळांची मागणी शिंदे-फडणवीसांनी मान्य केली; मंत्रालयात फुले दांपत्याच्या तैलचित्रांचे अनावरण

महात्मा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात फुले दाम्पत्यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले.
Mahatma Phule
Mahatma PhuleSarkarnama

मुंबई : माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रयत्नांतून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले (Mahatma Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले आहे. फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ( Mahatma Phule and Savitribai Phule Latest News)

क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशभरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली करून दिली. या आद्य समाज सुधारकांचे तैलचित्र मंत्रालयात इतर महापुरुषांच्या तैलचित्रांसमवेत लावण्यात यावीत, अशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती.

Mahatma Phule
वसंत मोरेंचं दुखणं नेमकं काय? निवडून न येण्याची भीती की डावलल्याची नाराजी

पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन माजी मंत्री भुजबळांनी याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या मागणीला तत्काळ मान्यता देऊन अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते. त्यानुसार नुकताच शासन निर्णय देखील काढण्यात आला होता. त्यानुसार आज (ता. २८ नोव्हेंबर) महात्मा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात फुले दाम्पत्यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले.

Mahatma Phule
गायरान अतिक्रमणाबाबत अजितदादा विधानसभेत लक्षवेधी मांडणार

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले या ऐतिहासिक तैलचित्र आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी रेखाटले आहे. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी,प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com