गेले अनेक वर्ष कोल्हापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष पद घरातच असणाऱ्या माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांना काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्या जागी नवीन शहराध्यक्ष म्हणून नगरसेवक प्रवीण केसरकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर इचलकरंजी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी संजय कांबळे यांना पुन्हा देण्यात आली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपावली आहे.
काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली असून नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी. वेणूगोपाल यांनी या निवडी बुधवारी जाहीर केल्या.
सप्टेंबर 2019 मध्ये आमदार सतेज पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठे यश मिळवले. शिवाय, कोल्हापूर महापालिका, व जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसने ताकद दाखवल्याने सतेज पाटील यांचे नेतृत्व अधिक बळकट झाले.
त्यामुळे पक्षाने त्यांना पुन्हा या पदावर संधी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने शहराध्यक्षपदाचा चेहरा बदलला असून विद्यमान शराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या जागी नगरसेवक प्रवीण केसरकर यांना या पदावर संधी दिली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी जेष्ठ नगरसेवक केसरकर यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लागली आहे. काँग्रेसने संघटनात्मक बदल करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी निरीक्षक नेमले होते.
कोल्हापूर ग्रामीणसाठी काँग्रेसचे मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक तर शहरासाठी पक्ष निरीक्षक खासदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांशी मते जाणून घेतली होती. त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवला होता. दरम्यान, 19 मे रोजी पोलिसांना दमदाटी केल्याप्रकरणी सचिन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. योगायोगाने दुसऱ्याच दिवशी त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.