

90 lakh extortion case in Nashik: नाशिकमधील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच राजकीय पक्षांशी संबंधीत नेत्यांची वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत. जमिनी बळकावून तब्बल 90 लाखांची खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक उर्फ नैय्या खैरे आणि त्याचा सहकारी निलेश मधुकर याच्या विरोधात मसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
मखमलाबाद परिसरातील तक्रारदार अतुल अहेर यांच्या भूखंडाच्या सभोवती खैरे यांचा भूखंड आहे. तिथे म्हशींचा गोठा सुरू केला आहे. त्याच्या शेजारी अतुल आहेर आणि त्यांच्या मातोश्री मंगल आहेत यांच्या मालकीचा भूखंड आहे. भूखंड भडकाविण्यासाठी गेले सात वर्ष खैरे संबंधितांना धमक्या आणि त्रास देत होता.
भूखंडावर खैरे यांनी आपल्या गोठ्यातील शेण आणि मलमूत्र टाकून खतांचा खड्डा केला होता. हे लक्षात आल्यावर आहेर यांनी शासनाच्या माध्यमातून आपल्या जमिनीची मोजणी केली. त्यानंतर सीमेच्या खुणा म्हणून बांबू लावले.
आहेर यांची पाठ फिरताच खैरे यांनी पुन्हा त्या भूखंडावर आपला कब्जा करण्याचा प्रयत्न केला. गोठ्यातील मलमूत्र आणि मेलेली म्हैस टाकली. भूखंड मोकळ्या करण्याची विनंती केली असता संबंधितांना दमबाजी केली.
प्लॉट रिकामा करून हवा असल्यास 90 लाख रुपये द्यावे. 90 लाख रुपये न दिल्यास प्लॉटचा विचारही करू नये. हा प्लॉट आम्ही तुम्हाला मिळू देणार नाही अशी धमकी दिली. संदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी माजी नगरसेवक खैरे आणि त्याच्या सहकार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.