Sadabhau Khot, Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot : "माझ्या बोलण्याचा हेतू..." पवारांबाबातच्या वादग्रस्त वक्तव्यावर सदाभाऊ खोतांची जाहीर दिलगिरी

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाते सर्वेसर्वा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर टीका करताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठताच खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Jagdish Patil

Sangli News, 07 Nov : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठताच खोत यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे.

परंतु काही लोकांनी त्या शब्दाचा विपर्यास केला. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेत आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो. मी वापरलेली भाषा ही गावगाड्याची आहे. ती भाषा समजायला मातीत रुजावं लागतं, राबावं लागतं. मातीमध्ये मरावं लागतं. त्यानंतरच गावाकडची आणि मातीची भाषा समजते." अशा शब्दात खोत (Sadabhau Khot) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील काका शरद पवार यांच्यावरील टीका अजिबात खपवून घेणार नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय याबाबत आपण खोत यांना फोन लावून शरद पवार साहेबांबद्दल पुन्हा असं वक्तव्य करू नयेत अशी समज दिल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

संजय राऊतांची जहरी टीका

या सर्व प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीसांचे कुत्रा असल्याची जहरी टीका केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून खोत यांच्यावर टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT