Ajit Pawar : "पवार साहेबांबद्दल..."; शरद पवारांवरील टीकेचा निषेध करण्यासाठी अजितदादांचा थेट सदाभाऊंना फोन

Ajit Pawar On Sadabhau Khot : रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी जेष्ठ नेते शरद पवारांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण थेट सदाभाऊ खोत यांना फोन करून वक्तव्याचा निषेध केल्याची माहिती दिली आहे.
Sadabhau Khot, sharad pawar, Ajit pawar
Sadabhau Khot, sharad pawar, Ajit pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar On Sadabhau Khot : रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जेष्ठ नेते शरद पवारांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. अनेक नेत्यांनी खोत यांच्यावर टीका केली आहे.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण थेट सदाभाऊ खोत यांना फोन करून वक्तव्याचा निषेध केल्याची माहिती दिली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले.

"महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं हे शिकवलं आहे. विरोधकांबद्दल बोलताना मर्यादा पाळायची असते. कमरेखालची टीका कशी करायची नसते. आरोप-प्रत्यारोप होतात, पण ते मांडण्याची एक पद्धत असते. हे सगळं त्यांनी आपल्याला शिकवलं आहे.

हीच पद्धत पुढे वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पवारसाहेब, विलासराव देशमुख यांनी चालू ठेवली. पण कालंच वक्तव्य निषेधार्ह आहे. मी काल तीव्र शब्दात त्याचा निषेध केला आहे. शिवाय मी एवढ्यावरच थांबलो नाही, तर मी त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं, 'तुम्ही जे स्टेटमेंट केलं, ते आम्हाला कोणाला आवडलेलं नाही. कोणाविषयी व्यक्तीगत बोलणं ही आपली पद्धत नाही." असं आपण खोत यांना सांगितल्याचं अजितदादांनी (Ajit Pawar) सांगितलं.

Sadabhau Khot, sharad pawar, Ajit pawar
Shivsena UBT Manifesto : बारसू रिफायनरी, कोळीवाडा क्लस्टर अन् जुनी पेन्शन योजना, ठाकरेंनी वचननाम्यात दिली 'ही' आश्वासन

विनाशकाले विपरीत बुद्धी

तसंच अजित पवार यांनी खोत यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "पवार साहेबांबद्दल पुन्हा असं घडता कामा नये शिवाय कोणत्याच नेत्याबद्दल असं बोलू नये. तुमची विचारधारा वेगळी असू शकते. मतमतांतर असू शकतात. पण हे मांडताना ताळमेळ असला पाहिजे. हा विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रकार आहे. मी सदाभाऊ खोतांना सांगितलं. तुम्ही चुकीच बोलला, असं बोलून नवीन प्रश्न निर्माण करु नका. वडीलधार्‍यांबद्दल अशी वक्तव्य आम्हाला मान्य नाहीत."

आमदार खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय?

प्रचारसभेत बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, "शरद पवार यांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण एवढं हाणलं तरी शरद पवार (Sharad Pawar) भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा बदलायचा आहे. महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?"

Sadabhau Khot, sharad pawar, Ajit pawar
Raj Thackeray : मशि‍दीवरील भोंग्यांवर राज ठाकरे पुन्हा बरसले; म्हणाले, "मी तुम्हाला शब्द देतो…."

फडणवीसांनी खोतांच्या कानफडात मारायला पाहिजे होती

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, टीका करायला लोकशाहीत काही हरकत नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.

हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. हे संतांचे राज्य आहे. मात्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य संपवलं. म्हणून आम्हाला सत्ता बदलायची आहे. फडणवीसांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंबावर मुख्यमंत्री होता, असं राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com