Sadabhau Khot Sagar Khot Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP Results: सदाभाऊंच्या सूनबाईनं ZP जिंकताच मुलालाही आमदारकीचं स्वप्नं, जयंत पाटलांनाच आव्हान, म्हणाला, 'कासेगावचं पार्सल...'

Sagar Khot Video Viral : जिल्हा परिषदेतील मोहिनी खोत यांच्या विजयानंतर सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी जयंत पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. सागर खोत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Deepak Kulkarni

Sangli News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणुकांचा माहोल आहे. या निवडणुकांच्या काळात आरोप-प्रत्यारोपांनी प्रचारसभा आणि राजकीय वातावरण दोन्हीहीं तापल्याचं दिसून आलं होतं. याचदरम्यान,पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि भाजपचे विधान परिषदेचं आमदार सदाभाऊ खोत या दोन दिग्गज नेतेही एकमेकांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं होतं.आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पत्नीनं बाजी मारल्यानंतर पती व सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी थेट जयंत पाटलांनाच आव्हान देत विधानसभा लढण्याचेही संकेत दिले आहेत.

भाजप पुरस्कृत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई या जायंट किलर ठरल्या आहेत. झेडपी जिंकत त्यांनी नवा रेकॉर्ड केला आहे. आजपर्यंत खोत कुटुंबात कुणीही निवडणूक लढवून जिंकून आलं नव्हतं. सदाभाऊ खोत हे आजपर्यंत विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई झेडपीच्या मैदानात उतरल्यामुळे सगळ्यांच्या नजरा या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्याचं दिसून आलं होतं.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता.9 फेब्रुवारी) जाहीर झाला. या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राज्यात महायुती त्यातही भाजपाचाच डंका दिसून आला. या निवडणुकीत अनेक ठिकाणी दिग्गज उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. पण सांगली जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत रयत क्रांती संघटनेच्या मोहिनी सागर खोत यांनी विजय खेचून आणला आहे.

जिल्हा परिषदेतील विजयानंतर मोहिनी खोत यांच्या विजयानंतर सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी जयंत पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. सागर खोत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.त्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर सागर खोत हे आपल्याकार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत.

यावेळी सागर खोत यांनी व्हिडीओत माजी मंत्री जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसलाच खुलं आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, “ज्यांना तू बेटा म्हणालास, त्यांचा मी बेटा आहे बेटा. पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार”, असं म्हणत सागर खोत यांनी दंड थेोपटून थेट जयंत पाटील यांनाच आव्हान दिलं आहे.

आमदार सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी ‘आता काटा उलटा फिरायला लागला आहे, जयंत पाटील जास्त दिवस तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसात भाजपात येतील’, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जयंत पाटील म्हणाले, ‘दहा पक्ष बदलून हे तिकडे गेले आणि आता ते मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देत आहेत’, असं म्हणत जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT