Shivsena Politics : शिवसेनेत घराणेशाही! शिंदेंच्या आमदाराची पाची बोटं तूपात, पत्नी अन् सुनही ZPत

Shivsena MLA Mahendra Dalvi dynastic politics : राज्यात नुकताच झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा घराणेशाही दिसून आली असून शिवसेनेच्या घराणेशाहीला मतदारांनी स्वीकारल्याचे दिसत आहे.
Shivsena MLA Mahendra Dalvi dynastic politics
Shivsena MLA Mahendra Dalvi dynastic politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अलिबाग जिल्हा परिषद निवडणुकीत दळवी कुटुंबातील दोन उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

  2. थळ आणि चेंढरे मतदारसंघांतील निकालांनी घराणेशाहीला मतदारांचा स्पष्ट पाठिंबा मिळाल्याची चर्चा सुरू झाली.

  3. विजयावर प्रतिक्रिया देताना महेंद्र दळवींनी “मैं हू डॉन” म्हणत सुनील तटकरे यांना टोला लगावला.

Raigad ZP Election News : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असून यामध्ये नगरपरिषदा, महापालिका निवडणुका पार पडल्या. ज्यात घराणेशाही दिसून आली होती. ज्याची जोरदार चर्चा झाली, ज्यानंतर भाजपने आपल्या पक्षातील मंत्री, खासदार आणि आमदारांना आपल्या घरच्यांना मनाई आदेश काढले होते.

पण शिंदेंची शिवसेना आणि दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत घराणेशाहीचा बोलबाला झाला. आता हेच चित्र नुकताच झालेल्या झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही दिसून आले असून सध्या रायगडच्या राजकारणात सासू-सुनेची जोडी चर्चेचा विषय ठरला आहे. ज्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कुटुंबातील आहेत.

अलिबाग जिल्हा परिषद निवडणुकीत सासू-सुनेला मिळालेला विजयामुळे घराणेशाहीला मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कुटुंबातील या दोन्ही व्यक्ती असून एक त्यांच्या पत्नी मानसी दळवी असून दुसरी त्यांची सून आदिती नाईक दळवी आहेत. थळ आणि चेंढरे या दोन्ही मतदारसंघांतील या निकालांनी राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.

चेंढरे गटातून आदिती नाईक दळवी यांनी तब्बल पाच हजार ५५ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रविणा घासे यांचा पराभव केला. या मतदारसंघात ५७७ मतदारांनी 'नोटा'ला पसंती दिली, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. आदिती नाईक-दळवी यांच्या विजयामुळे शिवसेनेचे वर्चस्व या भागात अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.

Shivsena MLA Mahendra Dalvi dynastic politics
Maharashtra Dynastic Politics: घराणेशाहीला जनतेनं नाकारलं, कार्यकर्त्यांना दिलं बळ! नेते मंडळीच्या कुटुंबातील 'या' उमेदवारांचा झाला पराभव

दरम्यान, थळ मतदारसंघातून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी सहा हजार ४६९ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शेकापच्या सानिका घरत यांचा पराभव करत हा मतदारसंघ ताब्यात ठेवला. या विजयामुळे अलिबागमध्ये दळवी कुटुंबाचा राजकीय प्रभाव अधोरेखित झाला असून घराणेशाहीला मतदारांचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा रंगली आहे. आगामी काळात या निकालांचे राजकारणावर परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दळवी यांचा दणदणीत विजय

रायगड जिल्हा परिषद निवडणूक विभाग गट क्रमांक ३४ चेंढरे (आरक्षण – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला) येथे अदिती नाईक दळवी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवडणूक लढवत प्रवीणा प्रमोद घासे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे अलिबाग तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात राजकीय चर्चेला वेग आला आहे.

या निकालाकडे केवळ स्थानिकच नव्हे तर जिल्हास्तरीय राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाने पाहिले जात आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मोठा राजकीय धक्का देत वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १० जागांपैकी तब्बल ९ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शेकापसह सर्वच पक्ष विरोधात असतानाही शिवसेनेने हा दणदणीत निकाल साधला आहे.

या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देत “मैं हू डॉन” असे म्हणत विरोधकांवर खोचक टोला लगावला. “आधी सर्वांनी गमजा मारल्या, पण आता कळलं असेल,” असेही ते म्हणाले. या वक्तव्यामुळे अलिबागच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. अदिती नाईक दळवी यांच्या विजयामुळे महिला नेतृत्वाला बळ मिळाले असून, आगामी काळात जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गटाची भूमिका अधिक प्रभावी राहणार असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत.

Shivsena MLA Mahendra Dalvi dynastic politics
Dynastic Politics : महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा कहर; पतीला ठाकरेंची उमेदवारी, पत्नीला शिंदेंच्या शिवसेनेचे तिकीट!

FAQs :

1. अलिबाग जिल्हा परिषद निवडणुकीत कोण विजयी झाले?
शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि सून आदिती नाईक दळवी विजयी झाल्या.

2. किती मताधिक्याने उमेदवार जिंकले?
आदिती नाईक दळवी यांनी 5,055 तर मानसी दळवी यांनी 6,469 मतांनी विजय मिळवला.

3. या निकालातून कोणती चर्चा सुरू झाली आहे?
अलिबागमध्ये घराणेशाहीला मतदारांचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

4. महेंद्र दळवींनी काय प्रतिक्रिया दिली?
विजयानंतर त्यांनी “मैं हू डॉन” असे म्हणत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना टोला लगावला.

5. या निकालाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
शिवसेनेची पकड अधिक मजबूत होऊन अलिबागच्या राजकारणात दळवी कुटुंबाचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com