Sadabhau Khot sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सदाभाऊ आक्रमक; थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार

Sadabhau Khot रयत क्रांती संघटनेच्या वतीने २२ मे रोजी कराड ते सातारा अशी ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली.

Umesh Bambare-Patil

Sadabhau Khot News : राज्यात कुठलंही सरकार सत्तेत आलं तरी शेतकर्यांची लुट थांबत नाही. त्यामुळे सत्ताकारणात गुरफटलेल्या राजकारण्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने २२ मे रोजी कराड ते सातारा अशी ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पदयात्रेदरम्यान सरकारने चर्चेस न बोलविल्यास सातारवरुन थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

सदाभाऊ खोत Sadabhau Khot म्हणाले,‘‘गेल्या काही दिवसात सामान्य जनतेचा आवाज कुठेही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना सरकारच्या वेशीवर टांगण्याचे काम ‘वारी शेतकऱ्याची’ या पदयात्रेच्या माध्यमातून करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये ऊसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव मिळत असताना गुजरात Gujrat राज्यात साडेचार हजार मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळण्यासाठी गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा.

तसेच सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा होण्यासाठी दोन कारखान्यांमधील २५ किमीचे हवाई अंतर कमी करावे. मुठभर लोकांच्या हितासाठी अस्तित्वात असलेला जमीन तुकडा बंदी कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. बारसू रिफायनरी प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर उभा राहताना अनेकदा शेतकर्याला पैसे देऊन गप्प बसविले जाते. मात्र, आता बारसू प्रकल्पात शेतकर्याच्या जमिनी जात असतीत तर त्याला कंपनीत भागधारक बनवावे.

जेणेकरुन, नफ्यातील रक्कम दर महिन्याला शेतकर्याच्या कुटुंबाला मिळेल. शेतकर्यांच्या या प्रश्‍नांच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन यात्रा तीन दिवसाच्या मुक्कामानंतर साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहे. या दरम्यान राज्य शासनाने संवेदनशीलपणे मागण्यांचा विचार करावा अन्यथा थेट मंत्रालय येऊन जाब विचारू असा इशारा श्‍री. खोत यांनी दिला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT