Satara NCP News : जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व जाहीर सभा सात जूनला सकाळी ११ वाजता कुडाळ बाजार समितीच्या मैदानावर होणार आहे. या सभेच्या माध्यमातून तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जावळीतील नेते दीपक पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. आगामी विधानसभेसाठी आमची ही बांधणी असून आमदार शिवेंद्रराजेंना पाडूनच मी रिटायर्डमेंट घेणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
राष्ट्रवादी भवनात दीपक पवार Deepak Pawar यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. श्री. पवार म्हणाले, मध्यंतरी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन जावळी तालुक्यात Jawali मेळाव्यासाठी येण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यानी सात जून ही तारीख दिली आहे. श्री. पवार साहेबांच्या उपस्थितीत सात जुनला राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जावळीतून आम्ही या माध्यमातून बांधणी करत आहोत. मध्यंतरी विरोधी पक्ष नेते अजित पवारांच्या सभेमुळे राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण झाले आहे. आता शरद पवारांची सभा झाल्यावर कार्यकर्ते चार्ज होतील. आगामी विधानसभेची निवडणुक आपण सातारा जावळी मतदारसंघातून लढणार असून आमदार शिवेंद्रसिंहराजेंना पाडूनच मी रिटायर्डमेंट घेणार आहे.
जावळी, महाबळेश्वर बाजार समितीत आमचा पराभव झाला असला तरी आम्ही विरोधालाविरोध केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. पण, पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपच्या आमदाराशी केलेली युती याची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नोंद घेतली आहे. त्यावर ते योग्य निर्णय घेतील. सातारा पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली जाणार आहे.
त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्यासमवेत आमच्या दोन बैठका झालेल्या आहेत. आणखी बैठका होणार असून जागा वाटपावर चर्चा होणार आहे. शशिकांत शिंदे हेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते महाविकास आघाडीचे नेते असल्याने तेही पालिकेच्या निवडणूकीत आमच्यासोबत असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. जावळी तालुक्यात राष्ट्रवादीला चांगले वातावरण असून कार्यकर्त्याना चार्ज करण्यासाठी खासदार शरद पवार यांची ही सभा होणार आहे. वेळी भानुदास भोसले, दादा रासकर, मारुती महामुलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.