Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Samadhan Autade Mangalvedha : टेंभूच्या पाण्याने मार्ग बदलला अन् माण नदीकाठच्या शेतकऱ्यांचे चेहरे खुलले...

Tembhu Water Scheme : मंगळवेढ्यात प्रथमच टेंभूचे पाणी

हुकूम मुलाणी

Solapur Political News : उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या स्थितीत माण नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला. टेंभूचे पाणी माण नदीत सोडून या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टेंभू योजनेचे पाणी पहिल्यांदाच मंगळवेढ्यात आल्याने माण नदीकाठच्या शेतकऱ्यांचे चेहरे खुलल्याचे दिसून आले. (Latest Political News)

माण नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी गाव भेट दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये ममदाबाद शे येथे उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने माण नदीपत्रात पाणी सोडणे अडचणीचे ठरणार होते. मात्र, टेंभूचे योजनेतील पाणी सहजरित्या माण नदीपात्रात येऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले.

त्यानुसार आवताडेंनी तत्काळ त्यासंदर्भात टेंभूच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे त्या संदर्भात टेंभूचे पाणी सोडण्याची मागणी लावून धरली. यावर फडणवीसांनीही ग्रीन सिग्नल देत टेंभू योजनेचे सचिव दीपक कपूर यांना विषय मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

माण नदीकाठच्या तावशी, तनाळी, तरटगाव, सिद्धेवाडी, चिचुंबे, शेटफळ, लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद (शे), गुंजेगाव, घरनिकी, मारापूर, देगांव, शरदनगर या गावांना याचा लाभ होणार आहे. सध्या उजनी धरणामध्ये जवळपास ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सद्यःस्थितीला टेंभूचे पाणी मंगळवेढ्यात आल्याने शेतकऱ्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मारापूर येथील बंधाऱ्यात हे पाणी पाहताना शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. (Maharashtra Political News)

पाणीसाठा कमी असल्यामुळे उजनीचे पाणी माण नदीत सोडले जाणार याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आम्ही सांगोल्याच्या हद्दीपर्यंत येणाऱ्या टेंभूच्या पाण्याची मागणी आमदार आवताडे यांच्याकडे केली. ती मागणी सार्थकी लागली आहे. आता या भागातील शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची भावना ममदाबाद शे.च्या सरपंच सुवर्णा नवत्रे यांनी व्यक्त केली, तर तीस वर्षांपूर्वी तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी दिलेला लढा आज सार्थकी लागल्याचे मत पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. भारत पवारांनी व्यक्त केले.

याबाबत आमदार समाधान आवताडे म्हणाले, तालुक्यातील मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास कमी कार्यकाळात पूर्ण केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून नदीकाठचा शेतकरी जगवण्यासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागले. यातून टेंभूचे पाणी तालुक्याला मिळू शकते, हे सिद्ध केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT