Nitesh Rane Allegation : नारायण राणेंना जीवे मारण्याचा प्रयत्न; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप !

Nitesh Rane Allegation On Uddhav Thackeray : "नारायण राणेंना मारण्याचा कसा कट रचण्यात आला. कुठल्या गँगला सांगितलं गेलं..."
Nitesh Rane Allegation
Nitesh Rane AllegationSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane Allegation On Uddhav Thackeray : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, असे नितेश राणे म्हणाले. इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यावर ठाकरे गट आक्रमक होऊन नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Nitesh Rane Allegation
Nagar BJP News : कार्यकर्त्याच्या चिठ्ठीवर नितेश राणे म्हणाले, मी चिठ्ठीवाला नाही रे...

आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन नितेश राणेंनी हा खळबळजनक आरोप केला आहे. नितेश राणे म्हणाले, "आमचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मारण्याचा कट कसा रचण्यात आला. कुठल्या गँगला सांगितलं गेलं. कुठलं औषध पाजून, कुठलं इंजेक्शन मारून, कसा घातपात करावा, असा त्यांचा प्रयत्न होता. याची उदाहरणं आमच्याकडे आहेत, तशी माहिती देणारी माणसे आहेत," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

Nitesh Rane Allegation
Raj Thackeray News : मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाची रणनीती आज ठरणार; राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

"जसं राणे साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला गेला, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेलं आहे. त्यांना ठार करण्याची योजना होतीच. आता कधीतरी या सगळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, उद्धव ठाकरेंची पूर्ण चौकशी केली जावी. कोणत्या कोणत्या कटात ठाकरेंचा सहभाग आहे, याचा तपास केला जावा," अशी मागणीही राणे यांनी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com