Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant : तानाजी सावंतांच्या बचावासाठी सरसावले समर्थक; टीकाकारांचा घेतला समाचार

Maharashtra Political News : सत्ता, कोट्यवधींची संपत्ती असूनही समाजाकडे अनेक नेत्यांनी दुर्लक्ष केले

Harshal Bagal

Solapur Political News : मराठा आंदोलकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना लक्ष केले होते. तसेच नांदेड रुग्णालयात झालेल्या मृत्यूकांडांवरूनही आरोग्यमंत्री या नात्याने सावंतांना विरोधकांनी घेरले होते. विविध प्रश्नांवरून तानाजी सावंत सतत टीकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या बचावासाठी त्यांचे समर्थक सरसावले आहेत. समाजासाठी सावंतांनी काय-काय केले, याची माहिती देत शिवसेना कुर्डूवाडी शहरप्रमुख समाधान दास विरोधकांवर चक्क बरसले. राज्यातील अनेक नेत्यांनी सत्तेच्या समीकरणातून कोट्यवधींची कमाई केली आहे. अनेकांनी 70 वर्षे फक्त लुटण्याचे काम केल्याचा आरोपही दास यांनी केला आहे.

दास यांनी सावंतांवर टीका करणाऱ्या विरोधकांच्या मर्मावर बोट ठेवत अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच सावंतांनी आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या ७७ मराठा युवकांना कशी मदत केली, याबाबत माहिती दिली. दास म्हणाले, 'मराठा आरक्षणाच्या लढ्यात सरकारचा निषेधातून चार-पाच वर्षांखाली 42 तरुणांनी स्वतःला संपवले. त्या तरुणांच्या कुटुंबाला आधार म्हणून आरोग्यमंत्री सावंतांनी प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन भेटी देऊन सांत्वन केले होते. त्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत केली.'

'आताही तीन-चार महिन्यांत 35 मराठा तरुणांनी स्वतःला संपवले. त्यांच्या कुटुंबाला आधार म्हणून सावंतांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत केली, तर धनगर समाजातील आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या दोन तरुणांच्या कुटुंबालाही पाच लाखांची मदत सावंतांनी केली. अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था केली आहे,' याची आठवण करून देत समाधान दास यांनी विरोधकांवर बरसले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'तानाजी सावंतांना राज्यातील काही पक्षातील राजकीय लोक बदनाम करण्यासाठी टपलेली आहेत. त्यांनी कधीही कुणाला मदत केलेली नाही. अनेक आमदार, खासदारांनी 25 ते 30 वर्षे मंत्रिपद भोगली. त्यांनी सत्तेतून अमाप कोट्यवधी रुपये कमावलीही. त्यांनी मात्र आजपर्यंत समाजाकडे दुर्लक्षच केले. सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या समीकरणाचा अवलंब करीत आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी 70 वर्षे राज्याला लुटण्याचे काम केले', असा घणाघातही दास यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT