Nashik Shivsena : शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का! शोभा मगर यांचे निधन

Shobha Magar Death : नाशिक शिवसेनेतील आक्रमक चेहरा हरपला
Shobha Mahar
Shobha Mahar Sarkarnama

Nashik Political News : नाशिक शहर शिवसेनेला मंगळवारी मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शोभा मगर यांचे सकाळी निधन झाले. त्यांच्या एक्झिटमुळे शिवसेनाचा नाशिकमधील आक्रमक चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

शोभा किरण मगर यांचे मंगळवारी (दि. २८) अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्या आक्रमक महिला नेत्या म्हणून परिचित होत्या.

Shobha Mahar
Uddhav Thackeray : " बळीराजा संकटात असताना एक फुल प्रचारात, दोन हाफ कुठेत...?"; ठाकरेंनी सरकारला झोडपले

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. विविध आंदोलनात त्या आघाडीवर असत. शिवसेना पक्ष फूट पडल्यावर त्यांनी ठाकरे गटात राहणे पसंत केले होते. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर स्थानिक नेत्यांशी समन्वय नसल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटाने त्यांना उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नियुक्ती केली होती.

शोभा मगर यांनी नाशिकमध्ये शिवसेना तळागाळात पोहाेचवण्याचे काम केले. सत्ता नसताना त्यांनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. अनेक आंदोलने यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्या शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख सुनील बागूल यांच्या निकटवर्ती समजल्या जात होत्या.

(Edited by Sunil Dhumal)

Shobha Mahar
Maharashtra Politics : भाजपने सरकार पाडून दाखवले; महाविकास आघाडीला मात्र जमेना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com