Sharad Pawae, Samarjit Ghatge, Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Samarjit Ghatge : "गैबी चौक महाराष्ट्राच्या ओरिजनल वस्तादाचा...", 'तुतारी' हाती घेताच समरजित घाटगेंची तुफान फटकेबाजी

Jagdish Patil

Samarjit Ghatge joins NCP Sharad Pawar party : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांनी मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितित तुतारी हातात घेत भाजपला अखेरचा रामराम केला. हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कागलमधील गैबी चौकात पार पडला.

पक्ष प्रवेशानंतर भाषणात बोलताना समरजित घाटगे यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. शिवाय गैबी चौकातच सभा का घेतली? याचं कारण देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

... म्हणून गैबी चौकात कार्यक्रम

आपल्या भाषणात बोलताना समरजित घाटगे (Samarjit Ghatge) म्हणाले, "आज आपल्या देशाचे नेते शरद पवारसाहेब उपस्थित आहेत. येत्या काळात कागल-गडहिंग्लजमध्ये परिवर्तन घडवण्याची आज मुहुर्तमेढ झाली आहे. जयंत पाटीलसाहेब (Jayant Patil) म्हणाले की, पावसामुळे काय होणार? त्यावेळी मी त्यांना म्हणालो, 'जेवढा पाऊस येणार तेवढी जास्त लोकं तुमच्यासमोर येणार' गैबी चौकामध्ये 2009 मध्ये सदाशिवराव मंडलिकांचा रेकॉर्ड आजच्या सभेने केला हे मी अभिमानाने सांगतो.

शरद पवारसाहेब (Sharad Pawar) सभेला आले तो या समरजित घाटगेलो जो मान-सन्मान मिळतो, तो तुमच्यामुळे मिळतो. राष्ट्रवादीत अनेक प्रवेश होतील. मात्र, हा पहिलाच प्रवेश असा आहे, जिथे सभा घेऊन शरद पवारसाहेब पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करत आहेत."

महाराष्ट्राच्या ओरिजनल वस्तादाची जागा...

तर मला अनेक मिडियाच्या लोकांनी विचारलं की गैबी चौकातच कार्यक्रम का घेतला? तर मी त्यांना सांगितलं की, 'मी नाही तर पवारसाहेबांनी सांगीतलं इथेच सभा झाली पाहिजे.' कारण मागील काही काळामध्ये असं वाटलं की, ही जागा कोणाची तरी आहे. मात्र, हा गैबी चौक केवळ महाराष्ट्राच्या ओरिजनल वस्तादाची जागा आहे, याची आठवण करून देण्याची गरज होती. म्हणून इथे सभा घेतली, असं म्हणत त्यांनी हसन मुश्रीफांवर नाव न घेता निशाणा साधला.

कागलआधी गडहिंग्लज उत्तूरची लोकं

दरम्यान, आम्ही अनेक सभा घेतल्या कधीही सभा झाली गडहिंग्लजची लोकं सर्वात शेवटी यायची पण ही पहिली सभा अशी आहे की इथे कागलच्या आधी गडहिंग्लज उत्तूरची लोकं उपस्थित आहेत. राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय मी भविष्यासाठी घेतला आहे. येत्या काळातील परिवर्तनासाठी घेतला आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT