Eknath Shinde : ठाकरेंच्या आमदाराचं नाव घेताना CM शिंदे असं काही बोलले की, विधान परिषदेत एकच हशा पिकला

Eknath Shinde In Vidhan Parishad : महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवी सोहळा विधान भवनात मंगळवारी (ता.03 सप्टेंबर) पार पडला. यावेळी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठी गेल्या सहा वर्षातील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Sep : महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवी सोहळा विधान भवनात मंगळवारी (ता.03 सप्टेंबर) पार पडला. यावेळी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठी गेल्या सहा वर्षातील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेतील शतक महोत्सवी कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांचं स्वागत केलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असून त्यांचं आयुष्य संघर्षातून गेलं आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं. तर ज्या आमदारांना त्यांच्या सभागृहातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला त्यांची नावं वाचताना मुख्यमंत्र्यांनी चांगली फटकेबाजी केली.

विधान भवनात बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "वक्ता सत्ताधारी पक्षात असो किंवा विरोधी बाकावर त्याच्या भाषणात सर्वसामान्य माणसाविषयची तळमळ असावी लागते. सत्ता संघर्षात अनेकदा एकमेकांवर टीका करावी लागते. विनाकारण टीका होत असेल तर लोकांना त्या वक्त्याचा दर्जा कळतो. त्यामुळे सर्व आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा इथे सन्मान केला जात आहे.

CM Eknath Shinde
Praniti Shinde : इथं महिलाच सुरक्षित नाही, महिला मुख्यमंत्री दूरची चर्चा; प्रणिती शिंदे असं का म्हणाल्या?

बाळासाहेब भला माणूस आहे, पण...

यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे लोक आहेत. 'बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे देखील आहेत. बाळासाहेब भला माणूस आहे, पण चुकीच्या ठिकाणी आहेत.' अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी नीलमताई गोऱ्हे, नरहरी झिरवळ, आशिष शेलार, गोपिचंद पडळकर यांची नावं घेतली. तर भरत गोगावले यांची ओळख करुन देताना, 'ओठात एक आणि पोटात एक असं नसणारे, आहे ते उघड स्पष्ट बोलणारे, आमचे भरतशेठ गोगावले आहेत,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

CM Eknath Shinde
Sharad Pawar: घाटगेंनंतर भाजपचा आणखी एक नेता शरद पवारांच्या गळाला?

सुनील प्रभू येता येता राहिले

यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचं नाव वाचताना 'सुनील प्रभू देखील आहेत, ते येता येता राहिले आहेत.' असं मुख्यमंत्री म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यामुळे उत्कृष्ट भाषणासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी टाईमिंग साधत तुफान फटकेबाजी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com