Samarjitsingh Ghatge Meets Raju Shetty  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Samarjitsingh Ghatge : शरद पवारांच्या शिलेदाराने घेतली राजू शेट्टींची भेट, राज्यात नवीन राजकीय समीकरण?

Samarjitsingh Ghatge Meets Raju Shetty : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेट्टी यांची भेट महत्त्वपूर्ण ठरत आहे. याच मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना घाटगे यांच्या मागे राहण्यासाठी ही भेट होती का अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Rahul Gadkar

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले समरजितसिंह घाटगे यांनी नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेट्टी यांची भेट महत्त्वपूर्ण ठरत आहे. याच मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना घाटगे यांच्या मागे राहण्यासाठी ही भेट होती का अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मात्र घाटगे आणि शेट्टी यांच्या भेटीनंतर अनेक प्रश्नांना आणि आठवणींना उजाळा मिळाला. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी समाजकारणात कागलची ओळख आदर्श कागल व्हावे हे स्वप्न पाहिले होते. माझी ही तीच भूमिका आहे. त्यांच्या स्वप्नातील कागल निर्माण करण्यासाठी साथ द्या, अशी शेट्टी यांना राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील उपस्थित होते.

समरजितसिंह घाटगे (Samrjitsingh Ghatge) यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकरी आणि सर्वसामान्य आर्थिक सक्षम झाल्याशिवाय शाश्वत विकास साधता येणार नाही ही स्वर्गीय राजेसाहेब यांची विचारधारा होती. म्हणूनच त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस यांना केंद्रस्थानी ठेवले. खासदार राजू शेट्टी हे सुद्धा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र काम करत आहेत. दोघांचा मार्ग एकच आहे.

दरम्यान घाटगे आणि शेट्टी यांच्या भेटीमुळे कागल विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना नेमकी कोणाला पाठिंबा देणार यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघातील शेतकरी वर्ग स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जुळला आहे. जवळपास 20 ते 25 हजार शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठबळ देतो. तुल्यबळ ताकत नसली तरी किमान 20 हजार शेतकऱ्यांचे पाठबळ स्वाभिमानी शेतकरी संघटना देईल त्या उमेदवाराला मिळू शकते. त्यामुळेच ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT