Video Samarjeetsinh Ghatge : हसन मुश्रीफांना समरजितसिंह घाटगेंचे प्रत्युत्तर, 'पवारसाहेबांना जातीयवादी म्हणणाऱ्या...'

Samarjeetsinh Ghatge Criticized hasan mushrif : महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केली.
Samarjeetsinh Ghatge Ghatge hasan mushrif
Samarjeetsinh Ghatge Ghatge hasan mushrif sarkarnama
Published on
Updated on

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांनी काल (मंगळवारी) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मंत्री हसन मुश्रीफांच्या विरोधात समरजितसिंह यांचे तिकीट फिक्स आहे. समरजितसिंह यांच्या काल (मंगळवारी) झालेल्या पक्षप्रवेशावर हसन मुश्रीफ म्हणाले, काल शरद पवारसाहेबांनी सभा घेतली. माझ्या सारख्या अल्पसंख्याक सामान्य कार्यकर्त्याच्या मागे हे सगळे का लागले आहेत?

मुश्रीफ यांनी या केलेल्या आरोपाला समरजितसिंह घाटगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाच टार्गेट केले असून सर्वकाही दिलेल्या नेत्यांवरच मुश्रीफ यांनी जातीवाचक आरोप केला आहे', असा घणाघात घाटगे यांनी केला.

'मुश्रीफसाहेब मला काही बोलतात ते बोलू देत, पण मला त्यांच्या 'त्या' वक्तव्याचा राग, संताप आणि खंत वाटते. पवारसाहेबांचे अनेक वर्षाचे राजकारण आहे. विरोधी पक्षाने ही त्यांच्यावर असे बोलायचे धाडस केले नाही. मात्र ते काम पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. मुश्रीफ यांनी आता शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केला .त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली तेंव्हा त्यांना अल्पसंख्यांक म्हणून विषय नव्हता का?' असा सवाल घाटगे यांनी उपस्थित केला.

Samarjeetsinh Ghatge Ghatge hasan mushrif
Vijay Wadettiwar : 'मविआ'चे सरकार असताना एसटी संप भडकवला; विजय वडेट्टीवारांनी टायमिंग साधलं

'ते तुमच्या वडिलांच्या वयाच्या आहेत. त्यांच्यावर कुणीही असले आरोप करायचे धाडस करत नाही. ते तुम्ही केलं, तुम्ही हे घोर पाप केलं. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. समरजितसिंह घाटगे यांना काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही जाहीर माफी मागावी.' अशा शब्दात घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावले आहे.

'माझ्यापेक्षा मुश्रीफ यांनी शरद पवारसाहेबांना टार्गेट केले. शरद पवार आले, सभा घेतली. त्यांनी आपले विचार मांडले. तुम्ही त्यांच्यावर आरोप करण्याचे धाडस करत आहात . मुश्रीफ नेहमीच जातीचे कार्ड वापरतात,ईडीच्या छाप्यानंतरही त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावेळीही त्यांनी मी अल्पसंख्यांक असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याचे सांगितले होते. पण नंतर त्यांनी काय केलं हे सर्वांना माहिती आहे. शरद पवार यांच्यावर जातीचा आरोप करताय हे चुकीचा आहे.' असेही घाटगे म्हणाले.

...मग संभाजीराजेंना पाडले का?

'मुश्रीफ राजाविरुद्ध प्रजा असे म्हणत असाल तर 2009 ला संभाजी राजे छत्रपती देखील लोकसभेला उभारले होते . जर तुम्ही तसे म्हणत असाल तर 2009 ला ठरवून संभाजी राजे छत्रपती यांचा आतून पराभव केला का?' असा सवाल समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना केला.

Samarjeetsinh Ghatge Ghatge hasan mushrif
Latur Political News : लोकसभा निवडणुकीत गेलेली पत `जन सन्मान यात्रा` निलंगेकरांना मिळवून देणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com