Sambhaji Bhide Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चित्रपटाच्या विरोधात हिंसक आंदोलन प्रकरणी संभाजी भिडेंसह इतरांना अखेर जामीन

सरकारनामा ब्युरो

सांगली : आशितोष गोवरीकर दिग्दर्शित ऐतिहासिक कथा असलेल्या जोधा अकबर चित्रपटाच्या विरोधात २००८-०९ मध्ये सांगलीत आंदोलन करण्यात आले होते. (District Court) पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्यानंतर शहरात तोडफोड आणि जाळपोळी सारख्या हिंसक घटना घडल्या होत्या. (Sangli) एसटीसह सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (Maharashtra)

या प्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडेंसह ९० ते ९५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यानंतर वारंवार वाॅरंट बजावून देखील संबंधित आरोपी कोर्टात हजर राहिले नाही. त्यामुळे न्यायालयाने संभाजी भिडे यांच्यासह संबंधित आरोपींविरुद्ध अजामीनपात्र अटक वाॅरंट जारी केले होते. बारा वर्षापुर्वीच्या या प्रकरणात अखेर न्यायालयाने संभाजी भिडे यांच्यासह काही जणांना जामीन दिला आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप नेत्या नीता केळकर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सुनिता गोरे, शिव प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष हनुमंत पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, यासह अनेक धारकरी या आंदोलन प्रकरणात आरोपी होते. जोधा अकबर या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आला असून हिंदू आणि राजपूत समाजाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता.

संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली शकडो आंदोलकांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवत निदर्शने केली होती. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना अटक केल्यानंतर सांगली शहरात दंगल भडकली होती. एसटी बसेससह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊन शहरात संचारबंदी लागू करावी लागली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT