Sambhaji Brigade News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Brigade Vs Sadavarte : ॲड. गुणरत्न सदावर्तेंना दिला संभाजी ब्रिगेडने इलेक्ट्रिक ‘शॉक’

Maratha Reservation : सदावर्ते हे मेंटल आहेत असे ठरवत, संभाजी ब्रिगेडने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला इलेक्ट्रिक शॉक दिला.

Rahul Gadkar

kolhapur Latest News : राज्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा तीव्र होत आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाबद्दल नेहमी प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत. आताही त्यांनी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर मराठा समाजात ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Sambhaji Brigade gave electric 'shock' to Adv. Gunaratna Sadavarte)

कोल्हापुरातही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. संभाजी ब्रिगेडकडून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ॲड. सदावर्ते यांच्या विरोधात अनोखे आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. सदावर्ते हे मेंटल आहेत, असे ठरवत संभाजी ब्रिगेडने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला इलेक्ट्रिक शॉक दिला. तसेच, सदावर्ते मुर्दाबाद अशा घोषणा देत महिलांनी सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कोल्हापुरी चपलाचा हिसका दाखवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षण तसेच या विषयावरील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांना आव्हान दिले होते. जरांगे पाटील यांना अटक करा, अशी विधाने करून समाजाच्या शांततापूर्ण आंदोलन व आंदोलकांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. शांततापूर्ण समाजाची अवहेलना करतात, त्यामुळे याबाबत युवकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या विरोधात राज्यातील युवकांच्या रोष आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करीत संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढ्याला मराठवाड्यात हिंसक वळण लागले आहे. बीडमधील माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंखे यांचा घरावर दगडफेक करून आग लावण्यात आली आहे. त्यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे. पार्किंगमधील सर्व वाहनेही जाळण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT