Maratha Reservation : सरकार ॲक्शन मोडवर; मराठवाड्यातील सर्व तहसीलदारांची उद्या बैठक, कुणबी दाखल्यांसंदर्भात निर्णय होणार

Marathwada News : ज्यांच्याकडे कुणबी पुरावे सापडले आहेत, त्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्णय आज (ता. ३० ऑक्टोबर) जाहीर होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस जटील होत चालला असून, मराठा तरुण मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत आहेत. त्यातच बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंखे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठवाड्यातील सर्व तहसीलदारांची उद्या (ता. ३० ऑक्टोबर) बैठक बोलावली आहे. त्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आढावा घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Maratha Reservation : Meeting of all Tehsildars of Marathwada tomorrow)

मराठा आरक्षण संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही ऑनलाइन बैठक होणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी पुरावे सापडले आहेत, त्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्णय आज (ता. ३० ऑक्टोबर) जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Rane Vs Thackeray : मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला का गेले नाहीत?; नीतेश राणेंचा सवाल

मराठा आरक्षण उपसमितीच्या आजच्या बैठकीत मराठवाड्यातील ज्यांच्याकडे कुणबीचे पुरावे आहेत, त्यात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने प्रेझेंटेशनही झालेले आहे. त्यामुळे उद्यापासून कुणबी दाखले देण्याच्या कार्यवाहीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महसूलमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील तहसीलदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे.

या बैठकीत कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसं द्यायचं आणि त्याची प्रक्रिया काय असणार आहे, यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Eknath Shinde
Manoj Jarange Indefinite Hunger Strike : मराठा आंदोलकांच्या धास्तीने एसटी बसला पोलिसांचे कवच; बससेवा दुसऱ्या दिवशीही बंद

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री तथा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन मराठा समाजाने त्यांना जाब विचारला होता. त्यानंतर आज माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंखे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच, पार्किंगमधील त्यांची वाहनेही पेटवून देण्यात आली आहेत.

Eknath Shinde
Beed Latest News : बीडमध्ये मध्यरात्री तहसीलदारांची गाडी पेटविली !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com