Sambhajiraje Chhatrapati  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati : छत्रपती घराण्यातील उमेदवार? Instagram वर संभाजीराजेंचा जुना फोटो व्हायरल..!

Sanyogeetaraje Chhatrapati : महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे. यातच संयोगिता राजे यांच्याकडून शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांचा जुना फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभेच्या जागेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चांना उधाण आले असताना माजी खासदार संभाजीराजें यांच्याकडून वडील शाहू महाराज आणि त्यांच्या जुना फोटो व्हायरल केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेटसमुळे कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले जागेवर अंतिम निर्णय येत असताना संभाजीराजे यांच्या स्टोरीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. त्यातच महाविकास आघाडीकडून माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज (Shahu Maharaj chhatrapati) यांचे देखील नाव समोर आले होते. संभाजी राजे छत्रपती सात दिवस संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते.

आज मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा मतदार संघ काँग्रेसकडे गेल्यास शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने आज संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिता राजे (Sanyogeetaraje Chhatrapati) यांनी शाहू महाराज यांच्या सोबतचा फोटो इन्स्टा स्टोरीवर ठेवला आहे.

आज सकाळी दहाच्या सुमारास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वडिलांसोबत फोटो शेअर केल्याने त्याची चर्चा कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. शिवाय या फोटोमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात असून छत्रपती घराण्यातीलच उमेदवार असेल, पण संभाजी राजे छत्रपती की शाहू महाराज उमेदवार असणार यावर अंदाज लावला जात आहे.

Edited By: Rashmi Mane

SCROLL FOR NEXT