Shahu Maharaj, Dr Chetan Narake
Shahu Maharaj, Dr Chetan NarakeSarkarnama

Loksabha Election 2024 : शाहू महाराजांसोबत चेतन नरकेंच्या नावाचीही चर्चा; कोल्हापुरात गटबाजीने चुरस वाढली

Kolhapur Loksabha Constituency : कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून दोन नावांची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आज महाविकास आघाडीच्या बैठकीत अंतिम होण्याची शक्यता आहे.
Published on

Kolhapur Politcal News :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अलीकडेच कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यानंतर महाविकास आघाडीतील कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत तिढा सुटल्याची चर्चा होती. पण पुन्हा एकदा ट्विस्ट वाढला आहे. कोल्हापूर लोकसभेचा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याचे निश्चित मानले जात असताना या मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा कायम ठेवला आहे. श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव पुढे आले असताना गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांचे नाव ठाकरे गटाकडून पुढे आल्याचे समजते. आता यावर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Shahu Maharaj, Dr Chetan Narake
Lok Sabha Election 2024 : ‘मी आता कुणाच्याच पंगतीला बसणार नाही; लोकसभेचे मैदान शेतकऱ्यांच्या जिवावर मारणार’

कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha Constituency) उमेदवारीबाबत उमेदवारीची ऑफर येण्याची शक्यता आहे, असे सूचक वक्तव्य श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसकडून (Congress) त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही जागा काँग्रेसला सोडण्यापूर्वी ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. पुरोगामी विचार घेऊन शाहू महाराजांना ठाकरे गटासोबत निवडणूक योग्य वाटणार नाही. तशी शक्यताही खूप कमी आहे. या गोष्टीवर खूप काही अवलंबून आहे. शाहू महाराज यांचे मागे पडल्यास गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांचे नाव 'मातोश्री' पुढे करू शकते.

सहकारातील अनुभव आणि अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. चेतन नरके (Dr. Chetan Narake) यांची ओळख आहे. कमी वय आणि अभ्यासू वृत्ती तसेच राजकारणातील लांब पल्ल्याच्या भविष्यातील प्रवासामुळे महाविकास आघाडीतील (MVA) एका गटाचा डॉ. नरके यांना विरोध असल्याचे सांगितले जाते. शिवाय सहकारातील काही अंशी ताबा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे राहील, अशी भीतीही या गटाच्या मनात आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यात ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रात वाढवण्यासाठी लोकसभेची कोल्हापूरची जागा महत्त्वाची ठरू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चेतन नरके यांच्या रुपाने सहकारातील अनुभव असलेला खिलाडी ठाकरे गटाला मिळू शकतो. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील युवा नेतृत्व नरके यांच्या रुपाने ठाकरे गटाला मिळू शकते. त्यामुळे ठाकरे गटाची पहिली पसंती डॉ. चेतन नरके यांना असल्याचे समजते. शिवाय नरके यांच्या उमेदवारीसाठी काही अदृश्य हातानी देखील फिल्डिंग लावली असल्याचे सांगितले जाते.

गेल्या आठवड्यात शरद पवार (Sharad Pawar) कोल्हापुरात होते. त्यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चाचणीही झाल्याचे कळते. सध्या पवारांच्या मते दोन्हीही उमेदवार सक्षम असल्याचे मानले जाते. पवार यांचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवाय एकाला उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत कलह निर्माण होण्याचीही शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महाविकास आघाडी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(Edited by Avinash Chandane)

Shahu Maharaj, Dr Chetan Narake
Kolhapur News : 'मशाल की हाथ' उद्या ठरणार; कोल्हापूरसाठी शाहू महाराज जवळपास निश्चित...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com