Sambhajiraje Chhatrapati On Dhananjay Munde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Munde : "आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच"

Sambhajiraje Chhatrapati On Santosh Deshmukh Murder Case : बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे क्रूरकृत्य दाखवणारे फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. ज्यावर अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे क्रूरकृत्य दाखवणारे फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. हे फोटो पाहून सबंध महाराष्ट्र हळहळत असून धनंजय मुंडे यांच्यासह मारेकऱ्यांविरोधात संपात व्यक्त करत आहे. याचवेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे त्यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. आणि याचप्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती असं सीआयडीने दाखल केलेला आरोप पत्रातून पुढे आला आहे. सध्या सीआयडीने कोर्टामध्ये सादर केलेल्या दोषारोप पत्रांमधील देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. यानंतर अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील एक ट्विट करत, माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

या राजीनामा नंतर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी राजे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे आणि या चेहऱ्यांच्या मागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती.

मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. यांच्यात जराशी नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे अशी टीका छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT