Sambhajiraje Chhatrapati : वाल्मिक कराडचे 'आका'शी कनेक्शन असतांना अजितदादा त्यांना सरंक्षण का देताहेत; संभाजीराजेंचा सवाल

Sambhajiraje latest statement Santosh Deshmukh Murdur case : 'आका'नी नैतिक दृष्टा राजीनामा दिला पाहिजे,' अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
Santosh Deshmukh, Sambhajiraje Chhatrapati, Dhananjay Munde and Ajit Pawar
Santosh Deshmukh, Sambhajiraje Chhatrapati, Dhananjay Munde and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

'मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही, पण माझ्या कानावर ते आले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हत्येचे कनेक्शन उघड होत आहे. वाल्मिकी कराडवर खंडणीचा जो गुन्हा लावला आहे, त्यापेक्षा 302 चा गुन्हा लावावा अशी आमची मागणी आहे. टप्याटप्याने सर्व गोष्टी बाहेर येणार आहेत, त्यांनी नैतिक दृष्ट्या राजीनामा द्यायला हवे. सरकारने निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती दिवस वाट बघायची. धनंजय मुंडे हे फार मोठे मोठे बोलतात त्यांनी नैतिक दृष्टा राजीनामा दिला पाहिजे,' अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यापूर्वीचे देखील अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी राजीनामा दिल्यानंतर क्लीन चिट घेऊन पुन्हा राजकीय सत्तेवर आले आहेत. धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा गोडवा लागला आहे. अन्यथा धनंजय मुंडे यांनी वाल्मिकी कराडशी आपला काही संबंध नाही हे जग जाहीर करावे. मुंडे यांनी स्वतःच वटमुखत्यार पत्र वाल्मीकी कराडला दिले आहे. एवढं कनेक्शन असताना उपमुख्यमंत्री अजित पवार देखील संरक्षण देत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

Santosh Deshmukh, Sambhajiraje Chhatrapati, Dhananjay Munde and Ajit Pawar
Krishna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

व्यक्ती क्लिअर कट असता तर पालकमंत्री पद दिले असते. ज्या अर्थी पालकमंत्री पद दिले नाही, याचा अर्थ क्लिअर आहे. दोषी आहे म्हणूनच पालकमंत्री पद दिले नाही. धनंजय मुंडे यांना बीडमध्ये पालकमंत्री पद घेण्याचा इंटरेस्ट आहे म्हणूनच मंत्रीपद सोडलेले नाही, असा दावा देखील संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

राज्य सरकार गडकिल्ल्यावरील अतिक्रमण काढणार..

राज्य सरकारने गड किल्ल्यांवर अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले ही आपली जीवंत स्मारके आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयासोबत सरकारने आता खबरदारी देखील घेतली पाहिजे. विशाळगडचा प्रकरणात अनेक गोष्टींकडे दूर्लक्ष केल्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाला.

Santosh Deshmukh, Sambhajiraje Chhatrapati, Dhananjay Munde and Ajit Pawar
Valmik Karad: वाल्मिक कराडची परदेशातही ‘माया’?, सीआयडी, एसआयटीकडून शोध!

धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की अतिक्रमण काढले नाही पाहिजे. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हे सरकारने काढले पाहिजे. गड किल्ल्यांवर येऊन अतिक्रमण करणे हे कोणाचाच अधिकार नाही.

गड किल्ल्यांवर राहण्याचे नोंद असलेल्याच नागरिकांना गडांवर राहण्याचा अधिकार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून जी अतिक्रमण झाली ती हटवली पाहिजेत, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com