Ravana Dahan event at Kharda
Ravana Dahan event at Kharda Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, वाईट प्रवृत्ती नष्ट करा...

सरकारनामा ब्युरो

Rohit Pawar : जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथील किल्ला मैदानावर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वांत उंच रावणदहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनी खर्डा येथील जगातील सर्वांत उंच भगव्या ध्वजाला नमन केले.

रामायणातील प्रभू रामचंद्रांची व्यक्तिरेखा साकारणारे अरुण गोविल, लक्ष्मणाची भूमिका निभावलेले सुनील लाहिरी, सीतेची भूमिका केलेल्या दीपिका चिखलिया, क्रिकेटर केदार जाधव, खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रवीण गायकवाड, आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दसऱ्याच्या आठव्या माळेला करून समाजातील वाईट दहा गोष्टींचा नाश करण्याचा संकल्प करण्यात आला.

या वेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की खर्डा किल्ल्याजवळ जगातील सर्वांत उंच भगव्या ध्वजाच्या जवळ येऊन नतमस्तक होण्याचे भाग्य मला मिळाले. या वेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तसेच रावणाकडे पाहताना व्यक्ती म्हणून नव्हे तर त्याच्यात असणारे दुर्गुण व वाईट प्रवृत्तीचे दहन केले आहे. आपणही रावणातील वाइट गुण टाळून चांगले काम करावे, असे त्यांनी सांगितले.

शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांनी प्रबोधन केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या बहुसंख्य समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. रामायणात भूमिका करणारे, गुजरात येथून आलेले अरुण गोविल, सुनील लाहिरी, दीपिका चिखलिया, केदार जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हजारो लोकांच्या उपस्थित रावणदहन करण्यात आले. महिला दर्शकांची संख्या लक्षणीय होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT