sambhaji raje chhatrapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhajiraje Protest : संभाजीराजेंचा लढा यशस्वी! दिवसभरात 50 अतिक्रमणं जमीनदोस्त

Rahul Gadkar

Kolhapur Political News : विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात पुकारलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.

संभाजीराजेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर जिल्हा प्रशासनाने किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. या कारवाईत ५० अतिक्रमणे हटवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विशाळगडावर झालेल्या हिंसाचार घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाला टार्गेट केला असल्याचा आरोप संभाजीराजे यांच्यावर करण्यात आला. मात्र या आरोपाचे उत्तर अतिक्रमण काढल्यानंतर संभाजीराजे यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याला सुरुवात आहे. केवळ मुस्लिम नव्हे, तर हिंदूंच्या लोकांचेही अतिक्रमणे काढली आहेत. पहिले अतिक्रमण हिंदूंच्या दोन कुटुंबांचे काढले, असे सांगत आरोप करणाऱ्यांवर त्यांनी पलटवार केला.

आज दिवसभरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने 50 पेक्षा अधिक अतिक्रमणे हटवली आहेत. मंगळवारी देखील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असून जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने गडावर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान आज अतिक्रमण काढत्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 400 पेक्षा अधिक कर्मचारी, शासकीय अधिकारी यांच्यामार्फत अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांच्या आंदोलनाला यश आल्याची भावना सर्वत्र उमटत आहे.

किल्ले विशाळगडावरील 158 पैकी दोन अतिक्रमण धारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत शासकीय महाभियोक्ता, मुंबई उच्च न्यायालय यांचे अभिप्राय मागविणेत आले होते. ते अभिप्राय 15 जुलै 2024 रोजी प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.

अतिक्रमण काढण्याच्या पहिल्या दिवशी जवळपास 50 पेक्षा अधिक अतिक्रमण हटवण्यात आली. यामध्ये महसूल विभागाचे 90 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, दीडशे पेक्षा अधिक मजूर, पुरातत्व विभागाचे अधिकारी, महावितरण अधिकारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

या मोहिमेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी पन्हाळा-शाहूवाडी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी आप्पासाहेब पवार, तहसिलदार शाहूवाडी रामलिंग चव्हाण, सह संचालक पुरातत्व विभाग विलास वहाणे, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग चंद्रकांत आयरेकर, उपअभियंता सा.बां विभाग धनंजय भोसले, गट विकास अधिकारी शाहूवाडी मंगेश कुचेवार हे घटनास्थळी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT