Prakash Ambedkar on Vishalgad Violence : विशाळगडावरील 'राड्या'वरुन आंबेडकरांचा भिडे गुरुजींवर गंभीर आरोप; म्हणाले, संभाजीराजेंचं आंदोलन...

Prakash Ambedkar On Sambhajiraje Chhatrapati Protest : संभाजीराजेंचं विशाळगडावर आंदोलन सुरू असतानाच तिथे जोकाही प्रकार घडला आहे, आमच्या माहितीप्रमाणे...
Sambhajiraje PrakashAmbedkar Sambhaji Bhide.
Sambhajiraje PrakashAmbedkar Sambhaji Bhide.Sarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडावरील अतिक्रमणांवरुन प्रचंड आक्रमक झाले आहेत.त्यांच्यासह 50 हून अधिक शिवप्रेमींवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत.आता या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विशाळगडावरील 'राड्या'प्रकरणी आता वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी यांनी मोठी मागणी केली आहे.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. आंबेडकर म्हणाले, संभाजीराजेंचं विशाळगडावर आंदोलन सुरू असतानाच तिथे जोकाही प्रकार घडला आहे, आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे जे सैन्य आहे, धारकरी आहेत, त्यांनी तो धुडगूस घातला आहे.त्यांनी जाणूनबुजून तेथील लोकांना मारझोड करत दुकानांची तोडफोड केली असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

तसेच विशाळगडावर आधीपासून लोक राहत होते, त्यांनी अतिक्रमण केलं आहे,पण अतिक्रमण काढण्याचेही काही नियम आहेत.तुम्हाला ते लगेच काढता येत नाही.तसा प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर कारवाई केली जाते. राजकारणात अनेक डावपेच असतात, त्यातील हा डावपेच आहे असे आपण मानतो असेही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला विशाळगडावरील अतिक्रमण प्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली आहे.ते म्हणाले,विशाळगडाबाबतच्या बातम्या तुमच्याकडूनच आम्हाला कळत आहेत. त्यामुळे यात काही सत्य असेल असे आपण मानत नाही अशी भूमिका स्पष्ट करतानाच दुसरीकडे या मुद्द्यावर तोडगा निघू शकतो का? यावरचा मार्ग त्यांनी शोधला पाहिजे असेही ते म्हणाले.

Sambhajiraje PrakashAmbedkar Sambhaji Bhide.
Harshvardhan Patil News : ...अन् हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट 'पाकव्याप्त काश्मीर'शीच केली!

संभाजीराजेंचं शाहू महाराजांच्या पत्रावर भाष्य...

विशाळगडच्या घटनेप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांच्यासह 50 गडप्रेमींवर शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती समजताच संभाजीराजे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सुमारे दीड तास ठिय्या मारला. यानंतर त्यांनी शाहू महाराजांच्या पत्रावरही थेट भाष्य केले आहे.

संभाजीराजे म्हणाले, शाहू महाराज छत्रपती यांनी दोन भूमिका घेतल्या आहेत. खासदार म्हणून आणि वडील म्हणून त्यांच्या या भूमिका आहेत.स्वतः शाहू महाराज यांनी मला सांगितलं होतं की, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्याबरोबर बैठक घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी जिल्हाप्रशासकीय अधिकार्यांसोबत चर्चा करण्याचे ठरले होते, मात्र ते झाले नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Sambhajiraje PrakashAmbedkar Sambhaji Bhide.
Girish Mahajan News : मीच पाचवेळा जाऊन भेटलो, तरीही माझ्यावरच टीका; महाजनांचं जरांगेंना प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com