Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhajiraje : सोलापूरचे खासदार हे महाराज; तरी त्यांनी विमानसेवेबाबत दिल्लीत आवाज उठवावा...

सरकारनामा ब्यूरो

Sambhajiraje On Solapur Airport : एका चिमणीमुळे विमानसेवा थांबली हे सोलापूरचं दुर्दैव आहे. विमानतळाशिवाय शहराचा विकास शक्य नाही. आपण सर्वांनी याबाबत मागणी करायला हवी. मात्र, सोलापूरचं विमानतळ सुरू होत नाही, कारण तुमच्यात आणि तुमच्या नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नाही. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे महाराज आहेत, मात्र तरी त्यांनी एअरपोर्टबाबत दिल्लीत आवाज उठवला पाहिजे अशा शब्दांत माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांनी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना टोला लगावला आहे.

संभाजीराजे यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, सोलापूरचे खासदार हे महाराज आहेत, मात्र त्यांनी एअरपोर्टबाबत दिल्लीत आवाज उठवला पाहिजे. तसेच भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी देखील विमानतळाबाबत आवाज उठवला पाहिजे.

सोलापूर विमानतळाच्या मागणीसाठी तुम्ही मोर्चा काढला तर मी स्वतः त्या मोर्चात सहभागी होईल. सोलापूर ते पुण्यापर्यंत चांगला रोड झाला म्हणून तुम्ही समाधानी झालात हे योग्य नाही. सोलापूरने संकुचित मानसिकतेतून बाहेर पडावे असे मत देखील संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

काय आहे प्रकऱण ?

सोलापुरातील होटगी रस्त्यावर 350 एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्यालगतच सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. सुमारे 50 वर्षांपासून हा कारखाना कार्यरत आहे. भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरू होऊ शकत नाही. त्यामुळं हा चिमणीचा अडसर दूर करुन सोलापूरची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. 90 मीटर उंच असलेल्या चिमणीमुळं विमानसेवा सुरु करण्यात अडथळा येत आहे.

चिमणी पाडण्याचे आदेश आले खरे पण...

विमानतळापासून जवळ असलेल्या सिध्देश्वर साखर कारखान्याची कोजनरेशन चिमणी ही विमानसेवेत अडथळा ठरेल असा अहवाल देण्यात आल्याने DGCA ने परवानगी नाकारली. प्रकरण उच्च न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, चिमणी पाडण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र कोणतं ना कोणतं कारण सांगून हे काम आतापर्यंत तसंच रखडलेलेच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT