Winter Session : बोम्मईंच्या नावे खोटं टि्वट करण्यामागे कोण, सगळं कळलंय; मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा कोणाला?

Winter Session : हे तेव्हा हे लोक कुठे होते?
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सीमावादाचा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सीमावादाचा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा सीमाप्रश्नी महत्त्वाची बैठक घेतली. सीमाप्रश्नावर काही वाद निर्माण झाले आहेत यामध्ये असं ठरलं होतं की, कोणीच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे यायला - जायला विरोध करणार नाही. मात्र असं ठरलं असतानाही, आपल्या एका खासदारांना बेळगावला जाण्यासाठी बंदी केली आहे. सातत्याने मराठी भाषिक तिथे भांडतायेत. आपण त्यांच्यासोबत उभे आहोत. मात्र कोणीच कोणाला अडवणार नाही, असं ठरलं असतानाही तिकडच्या जिल्हाधिकाऱ्याने बंदी कशी आणली? कर्नाटकची दडपशाही आपण खपवून घेता कामा नये, असा मु्द्दा अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.

Eknath Shinde
Winter Session 2022: माता आणि आमदार, दोन्ही कर्तव्य तेवढेच महत्वाचे…

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शि्ंदे म्हणाले, "सीमाभागातील बांधवांच्या पाठिशी उभं राहिलंच पाहिजे, यात राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी बाकीचे बरेच मुद्दे आहेत. या प्रश्नावरअमित शाह यांनी यात लक्ष घातले आहे, त्यांनी कर्नाटकला समज दिला आहे. आम्ही महाराष्ट्राची भूमिका ठोसपणे मांडली आहे. यामध्ये मुख्यमंत्री बोम्मईंकडून केले गेलेल्या ट्विटचा मुद्दाही मुद्द्यावर चर्चा झाली आहे. बोम्मईंनी ते ट्विटस केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तसंच यावेळी मुख्यमंत्र्यानी ट्विट बाबत आपल्याला माहिती मिळाली असल्याचीही सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, हे ट्विट कुणी केली आहेत, याचीही माहिती सरकारने आता शोधून काढली आहे. या ट्विट्समागे कोणते पक्ष आहेत, याचीही माहिती कळाली आहे, असं म्हणत, मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिला आहे.

Eknath Shinde
Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाचा प्रश्न घुमला : 'कर्नाटकची दडपशाही खपवून घेऊ नका!'

...तेव्हा हे लोक कुठे होते?

"सीमा प्रश्नावर आता बोलणारे नेते बेळगावतील मराठी भाषकांवर अन्याय होत होता तेव्हा कुठे होते? आम्ही तिथं गेलो होते. पोलिसांचा मार, फटके आम्ही खाल्ले. छगन भुजबळांना सगळं माहित आहे. यामध्ये आम्ही तुरुंगातही गेलो आहे. आणि तुम्ही म्हणत आहात की, आम्हाला सीमाप्रश्नाचं काहीच पडलेलं नाही? आता जे बोलत आहेत तेव्हा हे कुठे होते? कोणत्या आंदोलनात हे सामील झाले होते?", असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com