Patole and Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : कुठला घोडा अन् कुठला बाजार ? शंभूराज देसाईंचा पटोलेंवर पलटवार

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara Political News : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सध्याच्या सरकारमध्ये घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केला. यावर मंत्री शंभूराज देसाईंनी पटोलेंचा चांगलाच समाचार घेतला. कुठला घोडा, कुठला बाजार ते पटोले यांनी पुढे येऊन सांगावे. त्यांनी हवेतील तीर मारायचे बंद करावे, असा टोलाही देसाईंनी लगावला आहे.

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कराड येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी शंभुराज देसाई उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर देसांईंनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. पटोलेंनी हवेत न बोलता पुरावे द्यावेत, असे आव्हानच त्यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शंभुराज देसाई म्हणाले, नाना पटोलेंनी हवेत तीर मारू नये. त्यांच्याकडे काय पुरावे असतील तर ते उघड करावेत. काय माहिती असेल तर ती ऑनकॅमेरा सांगावी. नुसतच घोडेबाजार चाललाय म्हणायचे, याला काही अर्थ नाही. कुठला घोडा, कुठला बाजार ते पुढे येऊन सांगावे. उगाच हवेत तीर मारायचा आणि भडक बोलायचे, असे काही चालणार नाही, असा इशाराही देसाईंनी दिला आहे.

आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित केले होते. त्यांची आता बदली करुन लोहमार्ग पोलिस अधीक्षक पदी बदली केली आहे. यावरुन नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली होती. यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी पटोलेंवर टीकेची झोड उठवली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT