Sanjay Patil : सांगलीच्या पाण्यात साताऱ्यातील नेत्यांची लुडबूड नको; अन्यथा..., संजय पाटलांचा इशारा

Sangali Political News : सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी वाढली आहे.
Shambhuraj Desai, Sanjay Patil
Shambhuraj Desai, Sanjay Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangali Political News : कोयना धरणातून सांगलीच्या वाट्याचे पाणी वेळोवेळी कृष्णा नदीत सोडले पाहिजे. हे पाणी आतापर्यंत नियोजनानुसार सोडले जात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्याबाबत सातारच्या पालकमंत्र्यांची लुडबूड सुरू असून, ती आम्ही खपवून घेणार नाही. पाणीप्रश्नी प्रसंगी राजीनामा देऊ, असा सज्जड दम खासदार संजय पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला.

संजय पाटील Sanjay Patil म्हणाले, सध्या सांगली जिल्ह्यात Sangali Politics दुष्काळी परिस्थिती असून, शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. पिण्यासाठी व सिंचनाला पाणी आवश्यक आहे. वीजनिर्मिती इतर माध्यमातून करता येईल. कालवा समितीत ठरल्याप्रमाणे सांगली जिल्ह्याच्या वाट्याला ३२ टीएमसी पाणी आले आहे.

तसेच वीजनिर्मितीसाठी लागणारे १२ टीएमसी पाण्याची मागणी आहे. कोयना धरणातून वेळच्यावेळी पाणी सोडणे आवश्यक आहे. पण पाणी सोडण्यात काहींनी अडकाठी केली आहे.यातून सांगली जिल्ह्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न दिसत आहे. भीक मागितल्यासारखी सांगली जिल्ह्यातील जनतेवर वेळ आणणे चुकीचे आहे.

पाण्याच्या माध्यमातून राजकारण केले जात आहे. पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावले जात आहे. आमच्या सोबत सत्तेत असलेले काही जण हा प्रकार करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. कोयना धरण कोणाच्या मालकीचे नाही. पाण्यात राजकारण आणणे चुकीचे आहे. यापूर्वीही दोन वेळा असा प्रकार घडला आहे. आता आम्ही हे खपवून घेणार नाही. Maharshtra Political News

Shambhuraj Desai, Sanjay Patil
Satara News : राज्यात आंदोलनं का सुरू आहेत? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण

प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी आहे. पाण्याबाबतचे सर्व अधिकार जलसंपदा मंत्र्यांकडे आहे. असे असतानाही काहीजण लुडबूड करून कोयनेतून सांगलीला येणारे पाणी अडविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चुकीचे असून, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रारी करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

Shambhuraj Desai, Sanjay Patil
Karad BJP News : साताऱ्याची जागा कमळ चिन्हावर लढवणार; येथे भाजपचाच खासदार होणार : धैर्यशील कदम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com