<div class="paragraphs"><p>Shivaji Kardile,&nbsp;Babanrao Pachpute</p></div>

Shivaji Kardile, Babanrao Pachpute

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

कर्डिले, पाचपुतेंच्या घरात ऐकू येणार सनईचे सूर

Amit Awari

अहमदनगर : यंदाच्या वर्ष अखेरीला अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) व आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या घरात सनईचे सूर ऐकू येणार आहेत. दोन्ही दिग्गजांच्या मुलांचे विवाह होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात लग्नाच्या तयारीची लगबग आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले व आमदार बबनराव पाचपुते हे दोघेही पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) असताना मंत्री होते. Sanai's tune can be heard in the house of Kardile, Pachpute

शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांच्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी अराजकीय घरातील मुलगीची निवड केली आहे. शिवाजी कर्डिले यांचे होणारे व्याही राजेंद्र कासार हे प्रगतीशील शेतकरी असून कर्डिले समर्थक आहेत. अक्षय कर्डिले व प्रियंका कासार यांचा मागील महिन्यातच साखरपुड्याचा कार्यक्रम झाला होता.

अक्षय कर्डिले, प्रियंका कासार

अक्षय व प्रियंका यांचा हा विवाह सोहळा 29 डिसेंबरला बुऱ्हाणनगर येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या विवाहासाठी शिवाजी कर्डिले यांनी भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेता संजय दत्ता पर्यंत सर्वांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्यासाठी दिग्गज नेते नगर शहरात येणार आहेत.

आमदार बबनराव पाचपुते व माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह यांचा इंद्रजित यादव यांची कन्या इंद्रायणी यांच्या बरोबर 24 डिसेंबरला विवाह होणार आहे. ओमायक्रोनच्या संसर्गाचा धोका लक्षात घेत हा विवाह सोहळा साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT