Sandipan Bhumare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : 'त्यांना' झोपेतही सरकार पडल्याचे दिसते; शिंदे गटाकडून खिल्ली

Sandipan Bhumare : राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या देणगीत तत्कालीन शिवसेनाचा मोठा हातभार

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या १० जानेवारी रोजी लागणार आहेत. यावेळी होणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाबाबत नेमके काय होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, सरकार पडणार असल्याची विधाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत वारंवार करतात. त्यांच्या या वक्तव्यांचा शिंदे गटाचे नेते, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी खिल्ली उडवली आहे.

संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना झोपीतही सरकार पडण्याच्या तारखा दिसतात. सरकार कधी जाणार हे सांगणारे राऊत, ठाकरे भविष्यकार आहेत. झोपीतून उठले की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे सरकार दिसते. त्यांना रात्री झोपीतही सरकार पडण्याची स्वप्न पडतात. त्यांना १, २ अशा तारखा दिसतात. तेच ते सकाळी उठून माध्यमसमोर बोलतात,' असा टोलाही भुमरे यांनी लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुमरेंनी सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या (Eknath Shinde) बाजूने लागेल, असाही विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'पात्र-अपात्रेच्या निकालाबाबत आम्ही बिनधास्त आहोत. दहा तारखेच्या निकालाची आम्हाला धाकधूक वाटत नाही. समोरच्यांचीच धडधड वाढली आहे. आम्ही जे काही केले ते कायदेशीर बाजू तपासून केले आहे. आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे. त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागेल.'

पैशाला नाही तर राम मंदिराला महत्त्व

आयोध्या येथील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उदघाटन आहे. यावर बोलताना, 'राम मंदिर साकारण्यासाठी कोणी किती पैसे दिले यापेक्षा राम मंदिर होत आहे याचा आनंद आहे. आम्ही अनेक वेळा अयोध्या दौरा केला आहे. कुणी काय दिले यापेक्षा मंदिर होत याला महत्त्व आहे, पैशाला महत्व नाही. राम मंदिरासाठी त्यावेळी शिवसेनेतील सर्वांनीच सहभाग दिला होता,' असे म्हणत ठाकरेंनी दिलेल्या एक कोटीच्या देणगीवर भुमरेंनी खोचक टोला लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT