Rupali Chakankar : "अजितदादांमुळेच सुप्रिया सुळे 15 वर्षे बारामतीत निवडून आल्या, हे त्यांनी विसरू नये!"

Ajit Pawar & Supriya Sule : आता अजित पवार बरोबर नसल्याने त्यांना मतदारसंघात तळ ठोकावा लागत आहे.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्याच बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाही. जे खासदार आज दादांवर बोलतात, त्यांना अजित पवारांनी निवडून आणले आहे. विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना निवडणुकीत कोणतेही कष्ट पडलेले नाही. आता अजित पवार बरोबर नसल्याने त्यांना मतदारसंघात तळ ठोकावा लागत आहे. सुप्रिया सुळे तर 15 वर्षे केवळ दादांमुळेच निवडून आल्या असल्याच्या दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळेंवर टीकेची झोड उठवली. भावनिक राजकारण अधिक काळ चालत नाही. विकासाच्या मुद्यावरच लोक तुमच्याकडे पाहत असतात. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच विरोधी पक्षातील लोक त्यांच्यावर टीका करत असल्याचे चाकणकर म्हणाल्या.

Rupali Chakankar
Ahmednagar Lok Sabha Constituency: सुजय विखेंशिवाय भाजपकडे दुसरा चेहराच नाही!

केवळ भावनिक राजकारण करून कामे होत नाही. आज दोन्ही खासदार अजित पवारांवर टीका करत आहेत. त्यांना निवडून आणण्यात त्यांचा किती मोठा वाटा आहे, याचा विसर पडला असल्याची टीका चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) केली.

खासदार अमोल कोल्हे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चावरही रुपाली चाकणकर यांनी टीकास्त्र सोडले. त्यांचा विराट मोर्चा, अफाट मोर्चा पाहिला आणि त्यांच्या सभा पाहिल्या तर 'रिकाम्या खुर्चा' शिवाय दुसरे काहीही नव्हते. त्यांना गर्दी देखील जमा करता येत नसेल तर उपयोग काय, अशी जहरी टीका त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'अजित पवारांना मुख्यमंत्री...'

अजित पवारांना मुख्यमंत्री होताना पाहायचे असेल तर आम्हांला काम करावे लागेल, दादांना मुख्यमंत्री करायचे आमचे स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, ते मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे. मात्र, केवळ इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर आवश्यक ते प्रयत्न देखील होणे गरजेचे असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल, असे भाकीतही त्यांनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Rupali Chakankar
CM Shinde Shirur Daura: मुख्यमंत्री शिंदे येणार शिरुरच्या दौऱ्यावर; कोल्हे म्हणाले, 'मनापासून स्वागत...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com